Indore Amalner Bus Accident Saam tv
महाराष्ट्र

Bus Accident: बहिणीची वेडी माया..पाऊस सुरु झाल्याने थांबवले अन्‌ अनर्थ टळला

बहिणीची वेडी माया..पाऊस सुरु झाल्याने थांबवले अन्‌ अनर्थ टळला

साम टिव्ही ब्युरो

कळमसरे (जळगाव) : कळमसरे (ता.अमळनेर) येथील दर्शन मोतीलाल चौधरी हा युवक देखील अपघात झालेल्या इंदोर -अमळनेर याच बसने प्रवास करणार होता. परंतु पाऊस (Rain) सुरू असल्याने त्याला बहिणीने थांबविल्याने ही वाईट घटना दर्शनसोबत झाली नाही. नेहमी आपल्या भावाप्रती काळजी घेणाऱ्या बहिणीची वेडी माया असते त्याची आज प्रचिती आली. (Jalgaon News Amalner Bus Accident)

कळमसरे (ता. अमळनेर) येथील रहिवासी दर्शन चौधरी हा गेल्या पाच– सहा दिवसांपासुन इंदोर येथे असलेल्या बहिणीला भेटायला गेला होता. वडिल मोतीलाल चौधरी यांनी कालच दर्शनला संपर्क करून घरी येण्यासाठी फोन केला होता. त्‍यानुसार अमळनेर- इंदोर बसने सकाळी येतो; असे त्याने आपल्या वडिलांना सांगितले. त्‍यानुसार आज सकाळीच या बसने यायला निघाला असताना बस सुटेल म्हणून घाई करणाऱ्या भाऊरायाला बहिणीने पाऊस सुरु आहे. उशिरा निघ सांगत दर्शनला थांबविले. ही घटना घडल्याने एकुलता एक भाऊ आज बहिणीच्या काळजीने अपघातातून (Accident) वाचला. दरम्यान उशिराने गावाकडे निघालेला दर्शन कळमसरे येथे पोहचल्याने त्याला भेटण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.

अन्‌ आई– वडीलांच्‍या डोळ्यात अश्रू

आपल्या मोठ्या बहिणीने आणि पाहुण्यांनी आज सकाळी काळजीपोटी मला थांबविले नसते. तर या वाईट दुर्घटनेतून वाचू शकलो नसतो; असे म्हणत घरी आल्यावर त्याने आपल्या आई वडिलांना मिठी मारीत अश्रू अनावर झाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain : राज्यात अतिमुसळधार पावसाचा अंदाज, हवामान विभागाने सांगितला शब्द ना शब्द

Famous Cardiologist: प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टरची आत्महत्या; कारमध्ये आढळला मृतदेह

Thursday Horoscope : पैशाच्या समस्या दूर होतील, ५ राशींच्या व्यक्तींचे कामात बढतीचे योग; वाचा गुरुवारचे राशीभविष्य

Maharashtra Politics : मोठी बातमी! महाराष्ट्रातील ६४ नगरसेवकांवर कारवाई; ३ वर्षांसाठी अपात्र, कारण काय?

Maharashtra News Live Update: अमृत 2.0 योजनेअंतर्गत उल्हासनगरसाठी २११.०६ कोटींच्या स्वतंत्र पाणी योजनेला मंजुरी

SCROLL FOR NEXT