जळगाव : जिल्ह्यातील बोदवड नगरपंचायतीसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी सुरु आहे. नगरपंचायतीच्या एकुण १७ जागासाठी मतदान झाले असून यापैकी सहा जागांचे निकाल लागले असून यात राष्ट्रवादीचा 5, तर शिवसेना (Shiv Sena) 3 व मात्र नुकताच लागलेल्या निकालात भाजप (BJP) व राष्ट्रवादीला समान मतदान मिळाल्याने ईश्वर चिठ्ठी काढली. यात भाजप उमेदवार विजयी झाले आहे. (jalgaon news Bodwad Nagar Panchayat Election Results ncp lead)
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या मुक्ताईनगर मतदार संघात बोदवड नगरपंचायत (Bodwad Nagar Panchayat election) येते. या नगरपंचायतीवर खडसे यांच्या नेतृत्वाखाली यापुर्वी भाजपची सत्ता होती. परंतु राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर होत असलेल्या नगरपंचायत निवडणूकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसने (NCP) सर्वच्या सर्व १७ जागा लढविल्या आहेत.
भाजपचे खाते उघडले
नगरपंचायतीच्या वॉर्ड क्रमांक 5 मधून भाजपचे उमेदवार विजय शिवराम बडगुजर हे ईश्वर चिठ्ठीवर विजयी होवून भाजपने पहिली जागा मिळवली. राष्ट्रवादी व भाजपच्या दोघा उमेदवारांना ३७४ अशी समसमान मते होती. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार गोपाळ गंगतीरे यांचा पराभव करत विजय मिळविला. खडसे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कॉग्रेसला बोदवड नगरपंचायतीत बहुमत मिळणार की भाजपची सत्ता कायम राहिल; याकडे संपूर्ण लक्ष असणार आहे. शिवाय मुक्ताईनगरचे विद्यमान अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील हे शिवसेनेचे असल्याने ते बाजी मारतील का? याकडे देखील लक्ष लागून आहे. मात्र खडसे यांनी निवडणूकीसाठी स्वत: मैदानात उतरूण प्रचार केला आहे, तर त्यांच्या कन्या ॲड. रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांनीही यासाठी जोरदार प्रयत्न केले आहेत. यामुळेच अद्यापपर्यंत राष्ट्रवादी कॉंग्रेस पुढे असून भाजप पिछाडीवर आहे.
सद्यस्थीतीत विजयाची आकडेवारी (१७ पैकी ६ जागेचा निकाल)
बोदवळ नगरपंचायत
एकुण जागा-17
भाजप- 1
शिवसेना-3
काँग्रेस-0
राष्ट्रवादी-5
इतर(अपक्ष)-
17 पैकी 9 जागेचा निकाल
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.