खासदार खडसे 
महाराष्ट्र

मुख्‍यमंत्रींना शेतकऱ्यांकडे लक्ष देण्यास वेळ नाही; किमान शब्द तरी पाळावा : खासदार खडसे

मुख्‍यमंत्रींना शेतकऱ्यांकडे लक्ष देण्यास वेळ नाही; किमान शब्द तरी पाळावा : खासदार खडसे

संजय महाजन

जळगाव : शेती नुकसानीचे पंचनामे न करता शेतकऱ्यांना सरसकट हेक्‍टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी असे मत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री नसताना औरंगाबाद येथे व्यक्त केले होते. आता मुख्यमंत्री असताना त्यांनी हा शब्द पाळावा. मात्र शेतकऱ्यांकडे लक्ष देण्यास त्यांना वेळ नाही; असा आरोप भाजप खासदार रक्षा खडसे यांनी केला आहे. (jalgaon-news-bjp-mp-raksha-khadse-cm-udhav-thakarey-target-farmer-help)

मुख्यमंत्री ज्या प्रमाणे शेतकऱ्यांशी बोलले त्याप्रमाणे मात्र ते वागत नाही. राज्यातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले असताना ते आता सरसकट नुकसान भरपाई देत नाहीत. पंचनामे केल्यानंतर नुकसान भरपाई देण्यात येईल, असे आता सांगत आहेत. आता त्यानी आपण दिलेला शब्द पाळून नुकसान भरपाई द्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

२५ वेळा पत्र दिले परंतु दखल नाही

राज्याचे मुख्यमंत्री शेतकरी विरोधी असल्याचा आरोप करीत त्या म्हणाल्या, शेतकऱ्यांचे वीज हे सरकार कट करीत आहे. थकबाकीदार शेतकऱ्यांचे वीज कट करू नये, याबाबतीत आपण स्वतः मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषिमंत्री दादा भुसे यांना एक नव्हे तर तब्बल पंचवीस पत्रे लिहिली. परंतु त्याची ते दखल घेत नाहीत, असा आरोपही खासदार रक्षा खडसे यांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Coconut Water Vs Lemon Water: नारळपाणी की लिंबूपाणी, उपवासाला कोणते ड्रिंक प्यावे?

Maharashtra News Live Update: काँग्रेस देशात अराजकता पसरवण्याचं काम करत आहे - फडणवीस

Congress Protest Live Update : इंडिया आघाडीच्या थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा

Joint pain causes: सांधे दुखत असतील तर सावध व्हा! वाढतं वयच नाही, तर ही कारणंही ठरू शकतात सांधेदुखीला जबाबदार

Seasonal Fruits : कोणत्या हंगामात कोणती फळे खावी? ९९% लोक करतात 'ही' १ चूक

SCROLL FOR NEXT