Jalgaon Saam tv
महाराष्ट्र

थरार..वाढदिवसाच्‍या जेवणाची ऑर्डर जीवावर बेतली; सिलिंडर स्‍फोटात आचारीचा मृत्‍यू

वाढदिवसाच्‍या जेवणाची ऑर्डर जीवावर बेतली; सिलिंडर स्‍फोटात आचारीचा मृत्‍यू

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : शहरातील जानकी नगरात गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन व्यावसायिक आचाऱ्याचा जागीच मृत्यू तर त्याचा सहकारी गंभीर झाल्याची घटना घडली. व्यावसायीक गॅस सिलिंडरला वापरण्यात येणाऱ्या (Jalgaon News) प्रेशर रेग्युलेटरमुळे हा स्फोट झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला. बन्सीलाल सुवालाल पांडे असे मयत स्वयंपाकीचे नाव असून त्याचा सहकारी बालकिशन जोशी जखमी झाला आहे. (jalgaon news Birthday meal orders man dies in cylinder blast)

जळगाव (Jalgaon) शहरातील नेरी नाक्याजवळील जानकी नगरात स्वयंपाकी बन्सीलाल पांडे (वय ५५; मूळ राहणार राजस्थानी) हे ४० वर्षांपासून वास्तव्यास आहेत. मंगळवारी (ता. ८) आलेल्या ऑर्डरचे काम करत असताना सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास अचानक सिलिंडरचा स्फोट (Cylinder Blast) झाला. स्फोटाचा आवाज येताच परिसरात एकच धावपळ उडाली. परिसरातील तरुणांनी धाव घेतल्यावर त्यांना आचारी बन्सीलाल पांडे मृतावस्थेत तर, गणेशलाल जोशी जखमी अवस्थेत दिसून आला. तरुणांनी तत्काळ पोलिस व अग्निशामक दलाशी (Fire Brigade) संपर्क केला व जखमी जोशीसह पांडे यांना रुग्णालयात हलवले. अग्निशामक दलाच्या दोन बंबांनी आग आटोक्यात आणली.

अन्यथा घडला असता मोठा अनर्थ

गॅस सिलिंडरच्या प्रेशर रेग्युलेटरला जोडलेल्या नळीत गळती होवुन आगीचा (Fire) भडका उडाल्याने स्फोट झाला असून स्फोटानंतर परिसरातील तरुणांच्या मदतीने अग्निशामक दलाच्या जवानांनी उर्वरित आठ भरलेले गॅस सिलिंडर आगीच्या ठिकाणाहून वेळीच बाजूला केल्याने पुढील अनर्थ टळला. अन्यथा एका मागून एक स्फोट घडले असते असे प्रत्यक्षदर्शींनी माहिती देताना सांगितले. घटनेची माहिती कळताच एमआयडीसी पोलिस (Police) ठाण्याचे पथकासह उपनिरीक्षक नीलेश गोसावी, मुद्दस्सर काझी, किशोर पाटील यांनी घटनास्थळ गाठले. घटनेचे गांभीर्य पाहता वरिष्ठ अधिकाऱ्यांसह महापौर जयश्री महाजन यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली.

अतिरिक्त प्रेशरसाठी जीवघेणा खेळ

व्यावसायीक आचारी असोत की, वाहनांमध्ये स्वयंपाक गॅस भरणारे भामटे असोत, ते गॅस सिलिंडरला प्रेशर रेग्युलेटर लावून त्याचा वापर करतात. यामुळे गॅससिलिंडरच्या पितळी वॉल्वची ऑइलसील लिक होऊन त्यातून गॅसगळती सुरू होते. तसेच प्रेशर रेग्युलेटरला लागलेली नळी जुनी झाल्यास तिच्यात लिकेज होऊन अपघात घडतो. तसाच प्रकार पांडे यांच्या सोबत घडल्याचा अंदाज घटनास्थळी व्यक्त करण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray-Uddhav Thackeray: 'एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी...', राज - उद्धव ठाकरेंचे मराठी विजय मेळ्याव्यातील अभूतपूर्व क्षण

Green Bangles Shravan : श्रावण महिन्यात सुवासिनी हिरव्या बांगड्या का घालतात?

ब्रेकऐवजी अ‍ॅक्सिलरेटर दाबलं अन् कार थेट गंगेत; नाविकांनी वाचवले नवऱ्या-बायकोचे प्राण;VIDEO

Vijay Melava Worli: 'ऐ काका उठना.....' राज ठाकरेंनी सांगितला बाळासाहेबांसोबतचा तो किस्सा, पाहा, VIDEO

Maharashtra Live News Update: चांदोली धरणातून‌ 4 हजार 500 क्युसेक विसर्ग

SCROLL FOR NEXT