suicide 
महाराष्ट्र

धक्‍कादायक..आईने मुलांना आधी पाजले विष; नंतर स्‍वतः घेतला गळफास

धक्‍कादायक..आईने मुलांना आधी पाजले विष; नंतर स्‍वतः घेतला गळफास

Rajesh Sonwane

जळगाव : घराज आई व दोन चिमुकले होते. या दोन्‍ही चिमुकल्‍यांना आईने विषारी द्रव पाजले. यानंतर रूममध्‍ये जावून पंख्‍याला साडीच्‍या सहाय्याने गळफास घेत आत्‍महत्‍या केली. ही धक्‍कादायक घटना खंडाळा (ता. भुसावळ) येथे घडली आहे. (jalgaon-news-bhusawal-mother-choked-the-children-first-and-then-suicide)

भुसावळ तालुक्यातील खंडाळा येथे पती– पत्‍नी व दोन मुले असा चौधरी परिवार वास्‍तव्‍यास होता. किशोर चौधरी हे खासगी फायनान्स बँकेत नोकरीला होते. मात्र, लॉकडाउनमध्ये नोकरी गेल्याने गावी येवून शेती करत होते. सदर घटना घडली त्‍यावेळी किशोर चौधरी हे शेतात गेले होते. घरी त्‍यांनी पत्‍नी अश्विनी व दोन मुले होते.

आत्‍महत्‍येचे कारण गुलदस्‍त्‍यात

विवाहिता अश्विनी चौधरी हिने दोघा चिमुकल्यांना आत्महत्येपूर्वी विषारी किटकनाशक पाजल्याचा संशय आहे. यानंतर पंख्याला साडी बांधून गळफास घेत आत्महत्या केली. दरम्यान,विवाहितेच्या आत्महत्येचे कारण समजलेले नाही. सदर प्रकाराबाबत पतीला कळविण्यात आले.

मुलगा रडत बाहेर आला अन्‌

अश्विनीने बुधवारी सकाळी आत्महत्या केली. तेव्हा श्रेयस (वय ९) आणि प्रणव (वय ३) हे मुलेही घरीच होते. श्रेयस रडत बाहेर आल्याने हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर दोन्ही मुलांना उलट्या झाल्याने त्यांना डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आले. त्यांना किटकनाशक दिल्याचे स्पष्ट झाले आहे. यात मोठा मुलगा श्रेयसची प्रकृती गंभीर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुण्यात

Success Story: शाळेसाठी दररोज ६ किमी पायपीट; शेतातही केले काम; IPS सरोज कुमारी यांचा प्रवास

Saturday Horoscope: पाच राशींच्या जीवनात येणार आनंदी-आनंद; होणार धन वर्षाव, जाणून घ्या आजचे राशीभविष्य

Bhadrapada Amavasya 2025: आजच्या शनी अमावस्येचं महत्त्व जाणून घ्या; 'या' चुका करणं टाळा

Pune: बैलगाडा शर्यतीत अपघाताचा थरार, तरुण खाली पडला अन्..., काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

SCROLL FOR NEXT