crime 
महाराष्ट्र

गांजा तस्करी..साडे सहा लाखांचा मुद्देमाल जप्त; धुळ्यातील दोन जणांना अटक

सापळा रचून वाहनासह ३३ किलो गांजा व आरोपींना पहाटेच्या वेळेस ३ वाजेच्या सुमारास ताब्यात घेण्यात आले आहे.

Rajesh Sonwane

भुसावळ (जळगाव) : शहरातील बसस्थानक परिसरात चारचाकी वाहनाने गांजा येत असल्याची गोपनीय माहिती बाजारपेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक यांना मिळाली होती. यावरुन त्यांनी पथक घेऊन खात्री केली असता, एका वाहनांमध्ये ३३ किलो गांजा मिळून आला आहे. या प्रकरणी धुळ्यातील दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. (jalgaon-news-bhusawal-Cannabis-smuggling-6.5-lakh-worth-of-property-seized)

रात्रीची नाईट पेट्रोलिंग करीत असतांना बाजारपेठ ठाण्याचे निरीक्षक दिलीप भागवत यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की, भुसावळ (Bhusawal) शहरात विक्रीसाठी वाहनाने गांजा येत आहे. या बातमीच्या आधारे पथक घटनास्थळी रवाना झाले. बातमीची खात्री करून सापळा रचून वाहनासह ३३ किलो गांजा व आरोपींना पहाटेच्या वेळेस ३ वाजेच्या सुमारास ताब्यात घेण्यात आले आहे. विशेष म्हणजे आरोपींनी रेल्वेतून हा गांजा आणला असून तो वाहनाद्वारे ते धुळे (Dhule) येथे नेत असल्याची माहिती आहे. आरोपींनी हा गांजा कुणाकडून खरेदी केला, खरेदीदार व पुरवठादार कोण? आदी बाबी तपासात निष्पन्न होणार आहेत. स्वीप्ट चालक विजय वसंत धीवरे (वय ४५, रा.धुळे) व नंदकिशोर हिरामण गवळी (वय २८, रा.धुळे) अशी अटकेतील आरोपींची नावे आहे.

३३ किलो गांजा जप्त

आज (ता. ३०) मध्यरात्री बाजारपेठ पोलिस (Police) ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक मंगेश गोंटला, हवालदार लतीफ शेख, कॉन्स्टेबल प्रणय पवार हे रेल्वे स्टेशन परीसरात नाकाबंदी करीत असताना मध्यरात्रीनंतर ३ वाजेच्या सुमारास मारोती स्वीप्ट (एम.एच. ०१ बी.टी.६६८२) हिची तपासणी केली असता वाहनातील दोघांची हालचाली संशयास्पद वाटू लागल्याने वाहनाची डिक्की उघडली असता त्यात प्लॅस्टीक बॅग उघडल्यानंतर त्यात गांजा आढळल्याने वाहनासह दोघांना ताब्यात घेवून पोलिस (Bhusawal Police) ठाण्यात आणण्यात आले. या प्रकरणी विजय वसंत धीवरे (वय ४५) व नंदकिशोर हिरामण गवळी (वय २८) यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. गांजाची मोजणी केल्यानंतर तो ३३ किलो आढळून आला. त्याचे बाजारमूल्य एक लाख ६५ हजार असून पाच लाखांचे वाहन जप्त करण्यात आले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: सत्तेची दोरी ओबीसींच्या हाती; मुस्लीम मतदार ठरणार निर्णायक

Winter Health: हिवाळ्यात फिट अँण्ड फाइन राहायचंय? तर आजपासून करा 'ही' कामे

Success Story: अनाथाश्रमात वाढला, पैशासाठी वेटर-डिलिव्हरी बॉय झाला, पण जिद्द सोडली नाही; आज IAS ऑफिसर, वाचा संघर्षाची गाथा!

viral video : धावत्या बसमध्ये चालकाला हार्ट अटॅक, अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Election : महायुतीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस? प्रचारसभेत अमित शाहांचे संकेत

SCROLL FOR NEXT