Ghatotkach cave 
महाराष्ट्र

अजिंठा लेणीजवळ आहे आणखी एक लेणी..जी होतेय नामशेष

अजिंठा लेणीजवळ आहे आणखी एक लेणी..जी होतेय नामशेष

साम टिव्ही ब्युरो

तोंडापूर (जळगाव) : अजिंठा लेणी डोंगर परिसरात पाचशे मीटर अंतरावर घटोत्कच बुद्ध लेणी आहे. फारशी परिचित नसलेल्‍या या लेणीचे पुरातत्त्व विभाग औरंगाबाद याच्या दुर्लक्षामुळे अस्तित्व धोक्यात आले आहे. (jalgaon-news-aurangabad-news-Ghatotkach-cave-is-another-cave-near-Ajanta-cave)

अंभई (ता. सिल्‍लोड) गावापासून सात ते आठ किलोमीटर अंतरावर जंजाळा गावाच्या उत्तरेस अजिंठा लेणी डोंगररांगमध्ये ५०० मीटर अंतरावर घटोत्कच बुद्ध लेणी कोरलेली आहे. अजिंठा लेणीच्या तुलनेत हि फारशी परिचित नसून लेणीचा परिसरात निसर्गरम्य वातावरणात आहे. लेणीला जाण्यासाठी पुरातत्त्व विभागाच्यावतीने पायऱ्या बांधण्यात आल्या आहे. मात्र जंजाळा गावातून लेणीत जाण्यासाठी ५०० मीटरचा रस्ता नसल्याने पर्यटकांना शेतशिवार, नाले पानतास पायदळी तुडवत लेणीपर्यंत जावे लागते.

गाभाऱ्यात गौतम बुद्धाची आसनस्थ मूर्ती

लेणीत वाकाटक वशाच्या मंत्यावर एक शिलालेख आहे. हा शिलालेख बुद्ध, धम्म आणि संघ यावर आधारीत आहे. जंजाळा गाव व किल्ला याच्या मधल्या भागात लेणी असून या लेण्यांतील दर्शनी भागात प्रशस्त (सभामंडप) दालन आहे. त्याला २० खांब असून मधल्या दोन कोपऱ्यातील दोन खांबाचा आकार व त्यावरील नक्षीकाम आगळी वेगळी आहे. दालनाच्या डाव्या बाजूला बुद्ध मूर्ती व शिलालेख आहे. त्यात अशामकच्या राजकन्येचा उल्लेख आहे. वाकाटक नरेशाचा मंत्री वराहदेव याने हि लेणी इस ना च्या ५ व्या शतकात खोदलेली आहे अशी माहिती त्यात दिलेली आहे. लेणीच्या गाभाऱ्यात गौतम बुद्ध याची आसनस्थ मूर्ती आहे. आसनाखाली हरन व मधे धम्मचक्र आहे. या लेणी पुरातन इतिहास असून हि विकासापासून कोसो दुर आहे.

पर्यटकांसाठी आकर्षण मात्र..

गावातील स्थानिक माणसे परिसरातील शेतकरी याच्या मदतीविना लेणीचा रस्ता शोधणे अवघड आहे. निसर्गरम्य वातावरणामुळे लेणी परिसर हौशी पर्यटकांसाठी हे आकर्षण ठरत आहे. अजिंठा लेणी, वेरूळची लेणी पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना याची माहिती मिळत नसल्याने व रस्ता नसल्याने या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना अगदी गावात आल्यावर देखील रस्ता सापडत नाही. अजिंठा लेणी प्रमाणे या लेणीत देखील तिन बौद्ध लेणी आहेत. एक चैत्य लेणी व दोन विहार सहाच्या शतकात या लेणीचे खोदकाम झाले. महायान बौद्ध धम्माने प्रभावित असल्याचे दिसून येते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Bhasha Vijay Live Updates: वरळी डोममध्ये मराठी अस्मितेचा जल्लोष! ठाकरे बंधूंच्या मेळाव्याला 'अमेरिकन पाहुणा' ठरतोय खास|VIDEO

दररोजचा संघर्ष! वाहत्या नदीतून शाळेत जातात हे विद्यार्थी! VIDEO पाहून अंगावर शहारे

Akola Horror : अकोल्यात धावत्या रिक्षात अल्पवयीन मुलीचा विनयभंग, चालकाकडून भंयकर कृत्य, वाचून संताप येईल

Marathi bhasha Vijay Live Updates : वरळी डोममध्ये राज ठाकरेंची व्हॅनीटी व्हॅन दाखल, पाहा व्हिडिओ

Nashik Accident : रिक्षाच्या धडकेत दोन वर्षीय बालकाचा मृत्यू ;घराच्या समोर खेळत असतांना घडला अपघात

SCROLL FOR NEXT