jalgaon Crime News Saam tv
महाराष्ट्र

jalgaon Crime News : फोटो व्हायरल करायची धमकी देत मुलीवर अत्याचार; संशयित ताब्यात

Jalgaon News: फोटो व्हायरल करायची धमकी देत मुलीवर अत्याचार; संशयित ताब्यात

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : मुलीशी ओळख निर्माण करून नकळत तिचे फोटो व व्हिडीओ केला. हे फोटो व व्हिडीओ व्हायरल (Jalgaon) करण्याची धमकी देत विद्यार्थिनीवर अत्याचार केला. तसेच तिला वारंवार त्रास देणे सुरु होते. या प्रकरणी एकाला एमआयडीसी पोलिसांनी (Police) अटक केली आहे. (Live Marathi News)

दानीश तडवी (रा. रामेश्‍वर कॉलनी) असे त्रास देणाऱ्या संशयिताचे नाव आहे. पिडीत विद्यार्थिनी अल्पवयीन असताना २०१९ पासून म्हणजे साधारण पाच वर्षांपासून दानीश तडवी तिला ओळखतो. या ओळखीचा गैरफायदा घेत त्याने मुलीला वेगवेगळ्या ठिकाणी नेवून सुरवातीला अश्‍लिल कृत्य करुन (Crime News) नकळत फोटो आणि व्हीडीओ बनविले. काही दिवसांनी मुलगी त्याच्यापासून दुर झाल्यानंतर त्याने पुन्हा २०२२ मध्ये मेहरुण परिसरात तिला नेऊन फोटो व व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतरही या भामट्याचा त्रास सुरूच होता. 

दरम्यान ७ ऑक्टोम्बरला पिडीत तरुणीने एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रुपाली महाजन, सहाय्यक फौजदार अल्ताफ पठाण, योगेश बारी, मुकेश पाटील, सचिन पाटील, चंद्रकांत पाटील, ललित नारखेडे आदींच्या पथकाने दानीश तडवी याला रामेश्‍वर कॉलनी परिसरातून अटक केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tourism Place: मनमोहक दृश्ये अन् सुंदर नजारा; कोकणातील या गावात वाहने नाही तर दारासमोर होड्या केल्या जातात पार्क

IPL 2025 Auction, Players List: 574 खेळाडू लिलावाच्या रिंगणात! या 12 मार्की खेळाडूंवर असेल सर्वांचं लक्ष

Shani Dev: शनिवारी बांधा काळा धागा, शनिदोष होईल दूर

Maharashtra News Live Updates: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आज येवला दौऱ्यावर

Gadchiroli News: गडचिरोलीत पोलिसांनी कट उधळला, पर्लकोटा नदीच्या पुलाजवळ बॉम्बस्फोट

SCROLL FOR NEXT