Dengue Saam tv
महाराष्ट्र

सावधान.. डेंग्यू सदृश्‍य आजाराने अमळनेरात तरुणाचा मृत्यू

सावधान.. डेंग्यू सदृश्‍य आजाराने अमळनेरात तरुणाचा मृत्यू

साम टिव्ही ब्युरो

अमळनेर : शहरातील विद्यानगर भागातील ३१ वर्षीय तरुणाचा ‘डेंग्यू’सदृश आजाराने मृत्यू झाला असून, तालुक्यात आणखी दोन (Dengue) डेंग्यूसदृश रुग्ण आढळून आले असल्याने आरोग्य विभाग खडबडून जागा झाला आहे. (Jalgaon Amalner Dengue Flu Death)

गेल्या काही दिवसांपासून शहरात पावसामुळे (Rain) रस्त्यालगत आणि खुल्या भूखंडात तसेच रिकाम्या प्लॉट भागात गाजर गवत तसेच इतर गवत आणि रोपटे वाढल्याने कीटक, डासांचे प्रमाण वाढले आहे. काही ठिकाणी भुयारी गटारींच्या (Jalgaon) खड्ड्यांमुळे डबके साचत असल्याने डासांचे प्रमाण तीव्रतेने वाढत आहे. पालिकेकडून रस्त्यालगत वाढलेल्या गवताची तसेच पालिकेच्याच खुल्या भूखंडात वाढणाऱ्या गवताची साफसफाई होत नसल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका पोहचला आहे.

आठ महिन्‍यांपुर्वीच झाले लग्‍न

एलआयसी कॉलनी, विद्यानगर, राधाकृष्णनगर, विठ्ठलनगर, पिंपळे रॉड आदी भागात डेंग्यूसदृश्य रुग्णांची संख्या वाढली आहे. विद्यानगर येथील तरुण मुकुल अनिल पिंगळे (वय ३१) या तरुणाला डेंग्यूची लागण झाल्यानंतर त्याच्या प्लेटलेट्स संख्या १० हजारापर्यंत खाली आल्याने त्याला उपचारसाठी धुळे येथे खासगी रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले होते. त्याची प्रकृती सोमवारी (ता. २२) जास्त प्रमाणात बिघडल्याने त्याला व्हेंटिलेटर लावण्यात आले होते. मात्र दुर्दैवाने मंगळवारी (ता. २३) पहाटे दोनला उपचार घेताना त्याचा मृत्यू झाला. मुकुलचे आठ महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. त्याला भाऊ, बहीण, वडील नसून फक्त पत्नी आणि आई असा परिवार आहे. दरम्यान, मुकुल चिखलदरा फिरायला गेला होता. तेथून आल्यावर त्याला तापाची लागण झाली. त्यामुळे बाहेरूनच त्याला डेंग्यूची लागण झाली.

..यांना झाली लागण

तालुक्यातील शिरूड येथेही एकाला डेंग्यू आढळून आला. तो पुण्याहून आला असल्याचे आरोग्य विभागाला सर्वेक्षणात आढळून आले. तर एलआयसी कॉलनीत एक महिला सुरतहून आल्यानंतर तिला ही डेंग्यूची लागण झाली आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गिरीश गोसावी यांनी जगदीश मराठे आणि उल्हास माकडे यांना सर्वेक्षणासाठी पाठवले होते. दरम्यान, नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik : कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक; अधिकारी न भेटल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर कांदे फेकून आंदोलन

Maharashtra Live News Update : केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक संपली

Amit Shah : 'पहलगाम हल्ला करणारे तिन्ही दहशतवादी मारले', शाहांकडून संसदेत माहिती | VIDEO

Dream Psychology: स्वप्नात वारंवार अपघात पाहण्याचे संकेत काय?

Mrunal Thakur: तुझं सौंदर्य पाहून चंद्रही लाजेल...

SCROLL FOR NEXT