महाराष्ट्र

कारमधून ४० किलो गांजासह दहा लाखांचा मुद्देमाल जप्त

साम टिव्ही ब्युरो

अमळनेर (जळगाव) : धरणगाव - सावखेडा रस्त्यावर कारमधून ४० किलो गांजा घेऊन जाणाऱ्या एरंडोल येथील संशयिताना पोलिसांनी मुद्देमालासह ताब्यात घेतले. ही धडक कारवाई सोमवारी रात्री केली. (jalgaon-news-amalner-police-cannabis-worth-10-lakh-ruppees-seized-from-car)

गांजाची चोरटी वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी आपल्या पथकात सहाय्यक पोलिस निरीक्षक राकेश परदेशी, पोलिस कर्मचारी किशोर पाटील, मिलिंद भामरे, मधुकर पाटील यांना सोबत घेऊन सोमवारी (ता. १२) रात्री नऊच्या सुमारास सावखेडा शिवारात सापळा रचला. या वेळी त्यांना चोपडा - धरणगाव रस्त्यावर हॉटेल इंद्रायणीजवळ दुचाकीने (एमएच १९, बीसी ५७३०) येणाऱ्या व्यक्तींची हालचाल संशयित वाटली. त्याला लगेच ताब्यात घेतले असता त्याने त्याचे नाव सतीश चौधरी असे सांगितले. त्याच्यावर संशय बळावल्याने त्याचा मोबाईल जप्त करून घेतला. त्यानंतर लगेच त्याच्या मागे काही वेळाने नऊच्या दरम्यान एक पांढऱ्या रंगाची स्विफ्ट कार (एमएच ०१, बीटी ५०९) आली. तिला अडवून तपासणी केली असता त्यात ३९ किलो ५०० ग्राम असे २० पाकिटे गांजा डिक्कीत आढळून आला. वाहनचालक आकाश रमेश इंगळे (रा. मरिमातानगर, एरंडोल) व त्याच्यासोबत कासोदा येथील इस्लामपुरा भागातील शकिल खान अय्यूब खान या दोघांना ताब्यात घेतले.

साडेदहा लाखाचा माल जप्‍त

कारवाई करताच पोलिस निरीक्षक हिरे यांनी तत्काळ उपविभागीय पोलिस अधिकारी राकेश जाधव व तहसीलदार मिलिंद वाघ यांच्याशी संपर्क साधून शासकीय पंच मागवून पंचनामा केला. गांजाची किंमत ६ लाख असून, ४ लाखाची कार व ५० हजार रुपयांची मोटारसायकल असा एकूण १० लाख ५० हजार रुपयांचा माल जप्त करून तिघा संशयितांना अटक करण्यात आली आहे. मिलिंद भामरे यांच्या फिर्यादीवरून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस निरीक्षक जयपाल हिरे तपास करीत आहेत.

आणखी संशयितांचा शोध

संशयिताना मंगळवारी (ता. १३) दुपारी बाराला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिघांना १७ जुलैपर्यंत चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली केली आहे. तपासात अमळनेरमधील देखील काही नावे पुढे येण्याची शक्यता आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : उद्धव ठाकरे यांची धाराशिवमध्ये जाहीर सभा

Naach Ga Ghuma Film : "सगळं एकदम चोख, कौतुकासाठी शब्दच अपूरे..."; ‘नाच गं घुमा’ पाहताच प्राजक्ता माळी काय म्हणाली?

Pune Travel : पुण्यातील नयनरम्य निसर्ग; हनिमून आणि डेटसाठी परफेक्ट ऑप्शन असलेली भन्नाट ठिकाणे

Accident In Hingoli : हिंगोलीत भरधाव कार झाडावर आदळली, महिलेसह दोघे ठार; बुलडाण्यातही एसटी-खासगी बसच्या धडकेत महिला ठार

Summer Tips: अख्खी रात्र पंखा वेगानं चालू ठेवून झोपणे अंगाशी येईल; दुष्परिणाम भयंकर

SCROLL FOR NEXT