प्रेमीयुगुल 
महाराष्ट्र

‘त्या’ प्रेमीयुगुलला गोव्यातून घेतले ताब्यात

‘त्या’ प्रेमीयुगुलला गोव्यातून घेतले ताब्यात

साम टिव्ही ब्युरो

अमळनेर (जळगाव) : शहरातील व्यापाऱ्याच्या मुलीला पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी संशयित मोईन याला अटक झाली आहे. अमळनेर (Amalner) पोलिसांनी संबंधित युवक-युवतीला गोवा (Goa) येथून ताब्यात घेतले. (jalgaon-news-amalner-police-boy-and-girl-was-taken-into-custody-from-Goa)

मागील आठवड्यात २५ नोव्हेंबरला मोईन शेख याने एका युवतीला तिच्या घरासमोरून फूस लावून पळवून नेले. प्रथम मुलगी हरवल्याची तक्रार पालकांनी केली होती. मात्र मोईन यानेच पळवून नेल्याची खात्री झाली आणि घरातील रोकड व सोन्याचे दागिनेही चोरीला गेल्याने मुलीचाही कटात सहभाग असल्याच्या शक्यतेवरून मुलीच्या आईने मोईन शेख, मुलगी व इतर तीन जणांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला होता. त्यादरम्यान जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अप्पर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, डीवायएसपी राकेश जाधव यांनी विविध गटांच्या बैठका घेऊन तीन तपास पथके रवाना केली.

संपर्कातील तरुणांची चौकशी अन्‌ गाठले गोवा

मुलाच्या संपर्कात आलेल्या सर्व तरुणांची चौकशी करण्यात आली. इकडे शहरात तणाव निर्माण झाल्याने पोलिसांवर दडपण येत होते. अखेर पोलिस निरीक्षक हिरे यांच्या गोपनीय माहितीवरून पोलिस उपनिरीक्षक शत्रुघ्न पाटील, अमोल पाटील, राहुल पाटील यांनी मोईनला शोधण्यासाठी भिवंडी गाठली. मात्र तेथून तो गोव्याला पळाल्याचे समजताच त्यांनी गोवा गाठून दोघांना अमळनेरला आणले.

संशयिताने अत्याचार केल्याची कबुली

अमळनेरला आणल्यावर मुलीला विचारपूस केल्यानंतर तिने मोईन याने अत्याचार केल्याचे पालक व पोलिसांना सांगितले. पोलिसांनी आधार संस्थेच्या भारती पाटील, मनीषा पाटील, महिला पोलिस रेखा ईशी, नम्रता जरे आणि पालकांसमक्ष इनकॅमेरा जबाब दिल्याने पोलिसांनी मोईन याच्यावर अत्याचाराचे कलम वाढवून त्याला अटक केली. मुलीला पालकांच्या ताब्यात देण्यात आले. मुलगी परत पालकांच्या स्वाधीन करण्यात आल्याने नागरिकांनी शांतता राखण्याचे तसेच कुठेही अनुचित प्रकार होत असल्यास तत्काळ दामिनी पथक अथवा पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांनी केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: स्ट्रीट क्राईमला लगाम; विठ्ठलवाडी पोलिसांचे मध्यरात्री कॉम्बिंग ऑपरेशन

Fact Check: हरभजन सिंगनं शेअर केलेला झोम्बी ड्रग्जचा VIDEO नेमका कुठला? व्हायरल व्हिडिओमागील सत्य भलतंच

Tea on empty stomach: सकाळी उठताच रिकाम्या पोटी चहा पिता? शरीराला होऊ शकतात ‘हे’ त्रास, आजच बदला तुमची ही सवय

Independence Day Movies: स्वातंत्र्यदिनाचा उत्साह वाढवा; देशभक्तीची भावना जागवणारे 'हे' ७ चित्रपट नक्की पाहा

PM Kisan Yojana : पीएम किसान योजनेच्या 24 व्या हप्त्याचा लाभ कुणाला मिळणार? कोणत्या शेतकऱ्यांना फटका बसू शकतो?

SCROLL FOR NEXT