Jalgaon Ajit Pawar Saam tv
महाराष्ट्र

Ajit Pawar: ..तर विरोधीही वाकड्या नजरेने पाहणार नाही : अजित पवार

..तर विरोधीही वाकड्या नजरेने पाहणार नाही ः अजित पवार

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : कार्यकर्त्यांनी कोणताही भेदभाव न करता एक दिलाने काम करावे, त्यामुळे यश तर मिळेलच. शिवाय विरोधकही वाकड्या नजरेने पाहणार नाहीत, असे सल्ला राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी कार्यकर्त्यांना दिला. (Jalgaon Ajit Pawar News)

जळगाव (Jalgaon) येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या (NCP) जिल्हा मेळाव्यात ते बोलत होते. छत्रपती संभाजी महाराज नाट्यगृहात झालेल्या मेळाव्यात राज्याच्या विधानसभेचे माजी सभापती अरुणभाई गुजराथी, माजी मंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse), जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर, माजी मंत्री डॉ. सतीष पाटील, राजीव देशमुख, आमदार अनिल पाटील, ॲड. रोहिणी खडसे आदी उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले, की पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जनसंपर्क ठेवला पाहिजे, जनतेत जाऊन कार्य केले पाहिजे. त्यामुळे पक्ष बळकट होईल. जर तुम्ही जनतेत जाऊन काम केले तर कितीही वादळे आली तरीही तुम्हाला कोणीही हरवू शकणार नाही. दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, जयंत पाटील आदींची या वेळी उदाहरणे देण्यात आली.

खारीक बदाम खाऊ घालू का?

विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले, की कार्यकर्त्यांनी आपल्या कामाने ताकद निर्माण केली पाहिजे, त्यांनी जर काम केले पक्षाला त्याची दखल घ्यावीच लागते. कर्जत-जामखेड मतदार संघात रोहित पवार यांनी स्वत: काम करून यश मिळविले. काही कार्यकर्ते आपल्याला म्हणतात दादा आम्हाला ताकद द्या, अरे काय खारीक, बदाम खाऊ घालू का तुम्हाला... असा टोलाही त्यांनी लगावला. यावेळी त्यांनी ॲड. रोहिणी खडसे यांच्या जनसंवाद यात्रेचे कौतुक केले.

विरोधकांवर तुटून पडा : खडसे

माजी मंत्री आमदार एकनाथ खडसे म्हणाले, की पक्षातील कार्यकर्ते व नेत्यांनीही आक्रमक असले पाहिजे. त्यांनी एकी ठेवली पाहिजे, त्या माध्यमातून विरोधकांवर अत्यंत आक्रमकपणे तुटून पडले पाहिजे.

पाय खेचाखेची बंद करा : डॉ. पाटील

माजी मंत्री डॉ. सतीश पाटील म्हणाले, पक्षातील नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी एकमेकांची पाय खेचाखेची बंद केली पाहिजे. जिल्ह्यातील प्रत्येक नेत्यांने काम केले पाहिजे. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत आपल्या भागातून किती सदस्य निवडून आणणार याबाबत खात्रीने सांगितले पाहिजे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Live News: लातूरच्या अहमदपूरमधून जाणाऱ्या मन्याड नदीला पूर

Pune Accident: गणपतीच्या बुकिंगसाठी गेले असता भयंकर घडलं, ट्रकने ११ वर्षांच्या मुलीला चिरडलं; अपघाताचा थरारक VIDEO

Pune : पुण्यातील शाळेत अश्लील डान्स, अंगविक्षेप करत तरुणीनं लगावले ठुमके, Video Viral

Election Commission : आयोगाला पत्रकार परिषद भोवणार? व्होट चोरीचा मुद्दा महाभियोगापर्यंत जाणार?

Maharashtra Government: शेतकऱ्यांना मिळणार गुड न्यूज: बळीराजासाठी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

SCROLL FOR NEXT