Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon News: दूध संघ प्रकरणी पुन्हा पोलीस ठाण्यात

दूध संघ प्रकरणी पुन्हा पोलीस ठाण्यात

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : जळगाव जिल्हा दूध संघातील लोणी व दुधाची भुकटी चोरी प्रकरणाचा अजूनही वाद सुरू आहे. याबाबत गुन्हा दाखल होण्यासाठी खडसेंचा पाठपुरावा सुरू आहे. दरम्यान गुन्‍हा नोंदविण्यात यावा यासाठी (Jalgaon) जिल्हा दूध संघाचे कार्यकारी संचालक मनोज लिमये यांनी पुन्‍हा शहर पोलीस ठाणे (Jalgaon Police) गाठले. तरी देखील यांना गुन्‍हा नोंदविण्याविनाच परतावे लागले. (Live Marathi News)

जिल्‍हा दूध संघातील लोणी व दुधाची भुकटी चोरी प्रकरणी आमदार खडसे (Eknath Khadse) यांनी गेल्‍या आठवड्यात शहर पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन केले होते. परंतु, गुन्‍हा नोंदविला गेला नाही. यानंतर खडसेंनी आंदोलनाला स्थगिती देवून न्यायालयात दाद मागणार असल्याचे सांगितले होते.

लिमयेंनाही यावे लागले परत

न्यायालयाच्या आदेशानुसार दूध संघातील चोरी प्रकरणी फिर्याद देण्यास गेलो होतो. परंतु पोलिसांनी आधीच जिल्हा दूध संघाबाबत गुन्हा दाखल केल्याचे पोलीस निरीक्षकांनी सांगितले असल्‍याची माहिती जिल्हा दूध संघातील कार्यकारी संचालक लिमये यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त भागांसाठी राज्य सरकार पावले उचलेल : सुनील तटकरे

महिलांनो! वजन लय वाढलंय? Weight Loss करण्यासाठी 'या' सवयी लगेच सोडा

Health Tips: दुप्पट वेगाने कमी होईल वजन; आहारात फक्त या एका गोष्टीचा करा समावेश, ३२ वरून २८ होईल कंबर

LPG Subsidy Rule: 1 ऑक्टोबरपासून 'या' ग्राहकांना मिळणार नाही सब्सिडी; आधारचं हे काम केलं नसेल तर सब्सिडी मिळणार नाही

Weekly Horoscope: तूळ, वृश्चिक आणि धनु राशींना मिळणार नवी संधी; जाणून घ्या आठवड्याचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT