Bribe: दहा हजार रुपये भोवले; शिक्षकाकडून लाच, मुख्याध्यापकासह दोघे जाळ्यात

दहा हजार रुपये भोवले; शिक्षकाकडून लाच, मुख्याध्यापकासह दोघे जाळ्यात
Dhule News
Dhule NewsSaam tv
Published On

सोनगीर (धुळे) : सोनगीर (ता. धुळे) येथील एन. जी. बागूल हायस्कूलच्या मुख्याध्यापक तथा प्राचार्याच्या सांगण्यावरून सहाय्यक शिक्षकाने शाळेतील शिक्षकाकडून लाच स्वीकारली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) पथकाने दोघांना पकडले. तक्रारदार शिक्षकाला कारणेदाखवा नोटिशीवर कारवाई न होण्यासाठी लाचखोर दोघांनी दहा हजारांची मागणी (Bribe) करीत तडजोडीअंती पाच हजार रुपये स्वीकारले. या प्रकरणी संशयित दोघांवर येथील पोलिस (Police) ठाण्यात गुन्हा दाखल झाला. (Letest Marathi News)

Dhule News
Shirdi Rain: रात्रभर ढगफुटी सदृश्य पावसाचे थैमाण; शेतीसह रस्ते पाण्यात, शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान

सोनगीर (Dhule) येथील एन. बी. बागूल हायस्कूलमध्ये तक्रारदार हा सहायक शिक्षक (Teacher) पदावर कार्यरत आहे. त्याला मुख्याध्यापक भानुदास हिरामण माळी याने कसूरीच्या कारणास्तव नोटीस दिली. त्याबाबत तक्रारदार हा मुख्याध्यापक माळी याला भेटण्यास गेला. त्याने शाळेतीलच सहायक शिक्षक हाफीजखान पठाण यांना भेटण्यास सांगितले. त्याप्रमाणे तक्रारदाराने यांनी हायक शिक्षक पठाण यांची भेट घेतली. पठाण याने तक्रारदाराला देण्यात आलेल्या कारणेदाखवा नोटिशीवर कारवाई न होण्यासाठी दहा हजार रुपयांची मागणी केली. त्यामुळे पीडित शिक्षकाने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली.

कारवाई टाळण्यासाठी पैशांची मागणी

एसीबीच्या पथकाने तक्रारीची पडताळणी केली. सहाय्यक शिक्षक पठाण याने तक्रारदाराकडे तडजोडीअंती पाच हजार लाचेची मागणी केली. याअनुषंगाने मंगळवारी (ता. १८) तक्रारदारला पडताळणीकामी मुख्याध्यापक भानुदास माळी यांच्याकडे पाठविले असता त्याने कारणेदाखवा नोटिशीवर कारवाई न होण्यासाठी लाचेची रक्कम सहायक शिक्षक पठाण याला देण्यास सांगितले. नंतर बुधवारी (ता. १९) एसीबीच्या पथकाने सापळा रचला. कारवाईत सहाय्यक शिक्षक हाफीजखान पठाण याने तक्रारदाराकडून मुख्याध्यापक माळी याच्या सांगण्यावरुन पाच हजार लाचेची रक्कम स्विकारली. संशयित माळी, पठाण याला ताब्यात घेण्यात आले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com