jalgaon rain 
महाराष्ट्र

पावसाचे कमबॅक..तीन आठवड्यानंतर जळगावात हजेरी

पावसाचे कमबॅक..तीन आठवड्यानंतर जळगावात हजेरी

Rajesh Sonwane

जळगाव : पावसाने गेल्‍या तीन आठवड्यांपासून दडी मारली होती. या काळात कडक उन्‍हाचे चटके जाणवत होते. मुळात मृग नक्षत्र संपले असताना दरमदार पावसाअभावी पेरणी देखील पुर्ण झालेली नव्‍हती. तर काही ठिकाणी पेरणीनंतर उगवलेली पिके पाऊस नसल्‍याने कोमेजून गेली होती. परंतु, तीन आठवड्यानंतर जळगावात पावसाची हजेरी लागली असून पावसाच्‍या आगमनानंतर बळीराजा सुखावला आहे. (jalgaon-news-after-three-weeks-Rain-comeback)

जिल्‍ह्यातच नव्‍हे तर संपुर्ण राज्‍यात पावसाने ओढ दिलेली होती. यामुळे शेतात उगवलेली पिके देखील कोमेजू लागली होती. पाऊस यावा याकरीता वरूणराजा वेगवेगळ्या प्रकार साकळे घालत होते. दरम्‍यान ९ व १० जुलैनंतर पावसाचा अंदाज वर्तविला होता. त्‍यानुसार गुरूवारी दुपारपासून ढगाळ वातावरण निर्माण होवून आज पावसाची जोरदार हजेरी लागली.

उकाड्यातून सुटका

जळगाव जिल्ह्यात अठरा वर्षानंतर जुलै महिन्यात मे हिटचा अनुभव आला होता. पावसाने दडी मारल्याने पारा ४० अंश सेल्सियसच्या पार गेल्याने अंगाची लाही लाही होत होती. दरम्यान, गुरुवारी दुपारनंतर वातावरणात बदल होऊन ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. आज सकाळपासून देखील ढगाळ वातावरण होते. आज दुपारी दोन वाजेनंतर काळे ढग जमा होवून जळगावात पावसाच्‍या जोरदार सरी बरसल्या. यामुळे जळगावकरांना काहीसा दिलासा मिळाला असून उकाड्याने हैराण झालेल्या जळगावकरांना दिलासा मिळाला.

बळीराजा सुखावला

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने कडक उन्‍हाचे चटके होते. यामुळे पिके देखील करपू लागली होती. परंतु, आज पाऊस आल्‍याने बळीराजा सुखावला असून, पिके देखील पावसानंतर डोलू लागली होती. तरी देखील अद्याप पुरेशा जोरदार पावसाची प्रतिक्षा कायम आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आज येलो अलर्ट जारी

Worli Fort : पावसाळ्यात फक्त १०० रुपयांत वरळी जवळच्या या किल्ल्याला द्या भेट

GK: 'या' देशात विद्यार्थी स्वतः शौचालये स्वच्छ करतात

HBD Ranveer Singh : वाढदिवस अन् सर्व इन्स्टाग्राम पोस्ट डिलीट; रणवीर सिंहचं नेमकं चाललंय तरी काय?

Dates Benefits: खजूर खाण्याचे हे ७ फायदे माहितीयेत का?

SCROLL FOR NEXT