Jalgaon News
Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon: जिल्हा दूध संघातील प्रशासक नियुक्ती कायम; औरंगाबाद खंडपीठाचे आदेश

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघावर नियुक्त करण्यात आलेली प्रशासक मंडळाची परिस्थिती ‘जैसे थे’ ठेवावी, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या (Aurangabad) औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. मात्र प्रशासक मंडळास धोरणात्मक निर्णय घेण्यास मनाई करण्यात आली आहे. (Jalgaon News District Milk Union)

जळगाव (Jalgaon) जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले. त्यावर शासनाने प्रशासक मंडळ नियुक्त करण्यात आले. शासनाच्या या निर्णयाला निवडून आलेल्या संचालकांनी (Mumbai) मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करून आव्हान दिले होते. त्या याचिकेवर सोमवारी (ता. १) न्यायमूर्ती मंगेश पाटील व न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. या वेळी न्यायालयाने प्रशासक मंडळ नियुक्तीची परिस्थिती ‘जैसे थे’ ठेवावी, मात्र प्रशासक मंडळाने कोणतेही धोरणात्मक निर्णय घेऊ नयेत, असे आदेश दिले. याचिकाकर्ते संचालक मंडळातर्फे ॲड. विनायक होन यांनी काम पाहिले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: सातारा, दुष्काळ आणि शरद पवार; साताऱ्याच्या सभेत देवेंद्र फडणवीस यांची चौफेर फटकेबाजी

SUV Cars in India: जबरदस्त लूक आणि पॉवरफुल इंजिन, 10 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीत येतात या SUV

Porsche New Car: व्हॉईस कमांड, 6 एअरबॅग्ज आणि 270kmpl स्पीड; पोर्शची डॅशिंग कार भारतात लॉन्च

Mumbai News : जेव्हीएलआर मार्गावरील वाहतुकीत ३१ मे पर्यंत बदल, नेमकं काय आहे कारण?

LSG vs KKR : कोलकाताकडून लखनऊचा दारूण पराभव, पॉइंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर

SCROLL FOR NEXT