Accident 
महाराष्ट्र

आनंदाच्या क्षणांवर दुःखाचा डोंगर..मुलाच्या लग्नाला दोन दिवस बाकी असताना आईचा अपघाती मृत्‍यू

आनंदाच्या क्षणांवर दुःखाचा डोंगर..मुलाच्या लग्नाला दोन दिवस बाकी असताना आईचा अपघाती मृत्‍यू

साम टिव्ही ब्युरो

सावदा (जळगाव) : कुटुंबातील मोठ्या मुलाचे लग्‍न काही तासांवर असल्‍याने घरात जय्यत तयारी सुरू होती. खरेदीची देखील लगबग होती. यामुळे अगदी आनंदी व उत्‍साहाचे वातावरण होते. कुटुंबात आनंदाचे वातावरण असताना दुःखाचा डोंगर येवून कोसळला. लग्‍नाला दोन दिवस बाकी असताना नवरदेवाच्‍या आईचा अपघाती मृत्‍यूने कुटुंब दुःखाच्‍या खाईत लोटले गेले.

सावदा- आमोदा रस्त्यावर आज सकाळी दोन भरधाव कारची समोरासमोर धडक होवून झालेल्या भीषण अपघातात नवरदेवाची आई भावना भरत सुपे (वय 40) या जागीच ठार झाल्‍या; तर पाच जण जखमी झाले आहेत. अपघातानंतर वाघोदा येथील लग्नघरी शोककळा पसरली आहे. अपघात एवढा भीषण होता की वाहने रस्त्याचे बाहेर शेतात जाऊन पलटी होवून चक्काचूर झाले.

खरेदीसाठी जात असताना अपघात

मोठे वाघोदा येथील सुपे कुटुंबातील मुलाच्या लग्नाची जय्यत तयारी सुरू असल्‍याने अख्या कुटुंबात आनंदाचे वातावरण होते. सुपे कुटुंबातील काहीजण आज जळगाव येथे खरेदीसाठी चारचाकी वाहनातून जात होते. या दरम्‍यान भिकनगाव पाल आमोदा महामार्गावर सावदा- पिंपरुळ दरम्यान त्यांच्या वाहनाला भीषण अपघात झाला. यात सुपे कुटुंबातील महिला ठार झाली. तर अन्य दोघे जखमी झाले.

गाडीवरील ताबा सुटला अन्‌

माजी पंचायत समिती उपसभापती भरत सुपे यांचे मोठे सुपुत्र पियूष यांचा लग्नानिमित्त सावदा येथील विश्रामगृहसमोर रविवारी (ता.५) रिसेप्शन सोहळा होता. शामियाना उभारून त्याची जय्यत तयारी सुरू होती. परिवारात शुभ कार्यक्रम असल्याने सर्वजण आनंदीत होते. खरेदीनिमित्‍ताने नवरदेवाची आई भावना सुपे यांच्‍यासह मुलगा क्रिष्णा सुपे, मोठी आई विद्या सुपे असे कार (क्र. डीएल १०, सीई ६१६५) जळगाव येथे जात होते. या दरम्‍या पिंपरूड रस्त्यावर चालक क्रिष्णा सुपे याचा गाडीला ओव्हरटेक करताना वाहनावरील ताबा सुटला. यात त्याचे वाहन समोरून येणारी कारला (क्र. एमएच, १९, एपी २६१२) घासून पलटी झाली. यात भावना सुपे यांचा जागीच मृत्‍यू झाला. तर विद्या काशिनाथ सुपे, क्रीष्णा सुपे यांच्यासह दोन्ही वाहनातील ५ ते ६ जण जखमी झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Milk Malai Benefits For Skin: दुधाची साय चेहऱ्याला लावा, कोरडी त्वचा होईल मऊ अन् मुलायम

'माझ्या मृत्यूला आई जबाबदार'; सोलापुरातील वकिलानं आयुष्याचा दोर कापला, २ पानी चिठ्ठीत सगळंच सांगितलं

Unhealthy Sleeping Pattern: 8 तासांची झोप घेऊनही तुमच्याकडून नकळत होतेय 1 चूक; आजारी पडण्याची शक्यता वाढते

Sharad Pawar News : "माझं लग्न होत नाही कृपया... " लग्नाळू तरुणाचं थेट शरद पवारांना पत्र, वाचा नेमकं काय म्हणाला....

Maharashtra Live News Update : अहिल्यानगरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात गायब झालेली ५ वर्षीय मुलगी १६ तासानंतर मृतावस्थेत सापडली

SCROLL FOR NEXT