Jalgaon News Saam TV
महाराष्ट्र

पप्पा, रडू नका अहो..आईच्‍या मृतदेहाजवळ बसून हुंदके देत मुलाकडून वडिलांचे सांत्वन

पप्पा रडू नका अहो..आईच्‍या मृतदेहाजवळ हुंदके देत मुलाकडून वडिलांचे सात्‍वन

साम टिव्ही ब्युरो

मेहूणबारे (जळगाव) : जामदा येथे सुनिताबाई यांचा मृतदेह येताच एकच टाहो फोडला. दोन्ही मुले आईचा मृतदेह पाहून आक्रोश करत होते. पाच वर्षांचा निरागस अन् गोंडस मुलगा नैतिक हा शव पेटीजवळ जाऊन आई-आई करत रडत होता. (Jalgaon News) त्यावेळी अनेकांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. पत्नीचा मृतदेह पाहून पतीही रडत होता. मोठा मुलगा आपल्या पाच वर्षाच्या भावाला कडेवर घेत व हुंदके देत पप्पा रडू नका अहो, पप्पा रडू नका, असं सांगत होता. हे दृश्य बघून उपस्थितांचे डोळे पाणावले होते. (Jalgaon News Accident Mother Death)

जामदा (ता.चाळीसगाव) येथील कोमलसिंग तिरसिंग राजपूत व त्यांची पत्नी सुनिता या जळगाव येथे पिंप्राळा भागात वास्तव्यास होते. मोठा मुलगा दिव्यराज हा १३ वर्षांचा असून, आठवीत तर लहान मुलगा नैतिक हा ५ वर्षांचा आहे.

१२ जुलैला कोमल राजपुत व त्यांची पत्नी सुनिता हे दोघे मुलगा दिव्यराज याला घेऊन दुचाकीवरून पिंपळनेर (ता. साक्री) येथे सोडण्यासाठी जात होते. या दरम्‍यान नेर कुसंबाजवळ रस्‍त्यावरील ब्रेकरचा अंदाज न आल्याने सुनिताबाई ह्या गाडीवरून खाली पडल्या. यानंतर त्यांना तातडीने धुळे (Dhule) येथील खासगी रुग्णालयात दाखल केले.

सुनिताबाई यांच्यावर उपचार सुरू असताना, त्या उपचारांना प्रतिसाद देत नव्हत्या. त्यामुळे त्यांना १४ जुलैला पुढील उपचारासाठी नाशिक येथे रवाना करण्यात आले. मात्र सुनिता राजपूत यांची पाच दिवस मृत्युशी झुंज सुरू असताना, १७ जुलैला त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेनंतर जामदासह परीसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्यावर आज सोमवारी पहाटे जामदा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

मुले झाली पोरकी

सुनिताबाई यांची दोन्ही मुले दिव्यराज आणि नैतिक हे दोन्ही मुले आईच्या प्रेमाला पोरकी झाली. दोन्ही मुले हुंदके देत आम्हाला आमच्या आईकडे घेऊन चला असे म्हणत असताना अनेकांचे डोळे पाणावले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबईत'हिट अँड रन'चा थरार! मध्यरात्री टँकरने डिलिव्हरी बॉयला चिरडले

Palghar Tourism : निसर्गाचा मनसोक्त आनंद घ्यायचाय; तर पावसाळ्यात पालघरमधील या ठिकांणाना नक्की भेट द्या

Maharashtra News Live Update: पुण्यातील कोंढवा परिसरात मोठी वाहतूक कोंडी

Mumbai Pune Missing Link: मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर 2 महिन्यातच खड्डे; व्हिडीओ समोर आल्याने एकच खळबळ

Gold Rate Today: सोन्याची किंमत घसरली! प्रति तोळा सोनं ₹1,46,730 वर; वाचा २४k, २२k, १८k सोन्याचा आजचा भाव

SCROLL FOR NEXT