जळगाव : काही दिवसांपासून लग्नाची तयारी सुरू होती. आनंद असताना मावस भावाच्या हळदीच्या कार्यक्रमात नाचून मजा केली. नाचून झाल्यानंतर रात्री उशिरा हॉटेलमध्ये जेवणाला गेले अन् त्याच्यावर काळाने झडप घातली. मध्यरात्रीच्या सुमारास पाळधीजवळ झालेल्या अपघातात (Accident) तरूणाचा मृत्यू झाला. (jalgaon news Accident death of a young man after his brother haldi program)
जळगाव (Jalgaon) शहरातील द्वारकानगर परिसरात राहणारा गणेश सुकदेव महाजन (वय 32) असे मृत तरूणाचे नाव आहे. गणेश हा महावितरणमध्ये नोकरीला होता. गणेश घरातील सर्वात लहान आहे. द्वारकानगर परिसरातच राहत असलेल्या मावस भावाचे लग्न (Marriage)असल्याने गणेश घरात देखील गेल्या दिवसांपासून आनंद होता. गणेशने देखील सर्व तयारी केलेली होती. परंतु, गणेशच्या अचानक जाण्याने महाजन परिवारावर दुःखाचा डोंगर पसरला आहे.
हळदीच्या कार्यक्रमात नाचून जेवणाला गेले
गणेशच्या मावस भावाचे आज लग्न आहे. रविवारी (ता.६) सायंकाळी हळदीचा कार्यक्रम झाला. यानंतर सर्वजण अगदी आनंदात रात्री दहा वाजेपर्यंत नाचले. नाचण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर साडेदहाच्या सुमारास गणेशसह त्याचा मोठा भाऊ किशोर, पाहुणे व मित्र परिवार पाळधी येथे हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले. येथे देखील सर्वांनी आनंद घेत लग्नाच्या कार्यक्रमासाठीचे नियोजन आखले.
मदतीसाठी भाऊ थांबला अन् बसला धक्का
हॉटेलवर जेवणाचा कार्यक्रम आटोपून सर्वजण घरी येण्यासाठी निघाले. गणेश व त्याचा मित्र सर्वात अगोदर मार्गस्थ झाले. परंतु, हॉटेलपासून निघाल्यानंतर काही अंतरावरच कारने मागून जोरदार धडक दिली. यात गणेशचा जागीच मृत्यू (Accident Death) झाला. तर त्याच्या सोबत असलेला मित्र गंभीर जखमी झाला. त्यांच्या मागून येत असलेला गणेशच्या मोठा भाऊ किशोरला रस्त्यावर कोणी तरी पडलेले दिसले. यामुळे मदत म्हणून थांबला असता गणेशचाच मृतदेह दिसला. हे पाहून किशोरला जबर धक्का बसला. यानंतर गणेशला रूग्णालयात नेले असताना डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. गणेशला एक मुलगा व एक मुलगी आहे. गणेशच्या पश्चात आई– वडील, पत्नी, मुले, भाऊ, वहिनी असा परिवार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.