Jalgaon Amalner News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon News: ५३ किलो गांजा जप्‍त; अमळनेरजवळ पोलिसांची मध्‍यरात्री कारवाई

५३ किलो गांजा जप्‍त; अमळनेरजवळ पोलिसांची मध्‍यरात्री कारवाई

साम टिव्ही ब्युरो

अमळनेर (जळगाव) : जळोदहुन अमळनेरकडे येणाऱ्या चारकीतून नेत असलेला ५३ किलो गांजा पोलिसांनी जप्‍त केला आहे. यासह चारचाकी, मोटरसायकल व मोबाईल असा सुमारे १२ लाख रुपयांचा माल (Police) पोलिसांनी जप्त केल्याची घटना आज (ता. १८) मध्‍यरात्री १ वाजेच्या सुमारास जळोद रोडवर घडली. (Breaking Marathi News)

पोलीस निरीक्षक जयपाल हिरे हे १७ नोव्‍हेंबरच्‍या रात्री गस्त घालत (Jalgaon) असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली. जळोद– अमळनेर (Amalner) रस्त्यावरून एक चारचाकीमध्ये गांजा विक्रीसाठी अमळनेर शहरात आणला जात आहे. हिरे यांनी तात्काळ डीवायएसपी राकेश जाधव यांना माहिती देऊन हेडकॉन्स्टेबल किशोर पाटील, मिलिंद भामरे, दीपक माळी, रवींद्र पाटील, सूर्यकांत साळुंखे, चालक सुनील पाटील यांना घेऊन जळोद रस्त्यावर विजयनाना कृषी महाविद्यालयाजवळ सापळा लावला.

पोलिसांना पाहून काढला पळ

काही वेळानंतर अर्थात मध्‍यरात्रीनंतर १८ नोव्‍हेंबरच्‍या पहाटे १ वाजेच्या सुमारास एक पांढरी कार आणि त्याच्या पुढे मोटरसायकल येताना दिसली. यामुळे पोलिसांनी त्यांना अडवण्यासाठी यंत्रणा सतर्क करताच कार चालक आणि मोटरसायकल चालक यांनी वाहने वळवून उलट्या दिशेने पळू लागले. पोलिसांनी देखील लागलीच वाहनात बसून त्यांचा पाठलाग सुरू केला. बचावासाठी आरोपीनी आपली वाहने नन्दगाव रस्त्याला वळवली. आरोपीना आपण पोलिसांच्या तावडीत सापडू याची जाणीव झाल्याने त्यांनी चारचाकी खड्ड्यात टाकली आणि तेथून उतरून पळ काढला.

८ लाखाचा गांजा केला जप्‍त

पोलीस वाहनाच्या प्रकाशात कारमधून उतरणारा आरोपी सराईत गुन्हेगार तौफिक शेख मुशिरोद्दीन (रा. गांधलीपुरा) हा असल्याची ओळख पटली. त्याच्यासोबत आणखी तीन अनोळखी आरोपी देखील पळून गेले. पोलिसांनी कारची डीक्की उघडली असता त्यात तीन गोण्यांमध्ये ८ लाख २ हजार ५०० रुपये किमतीची ५३ किलो ५०० ग्रॅम वजनाची २५ गांजाची पाकिटे आढळून आली. तसेच आरोपीनी सोडून दिलेली मोटरसायकल, दोन मोबाईल असा एकूण १२ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT