जळगाव : जळगाव जिल्ह्यातील वीज निर्मितीचा कणा म्हणजे दीपनगर- भुसावळ थर्मल पॉवर प्लांट आहे. राज्यातील प्रमुख थर्मल पावर तापीय वीज प्रकल्पांपैकी एक असून येथे सद्य स्थितीला १२१० मेगावॅट क्षमतेचे वीज उत्पादन सुरू आहे. तर आता या ठिकाणी सौर प्रकल्प उभारण्यात येणार आहे. सर्व परवानग्या आणि चाचण्या पूर्ण होताच उत्पादन सुरू होईल. हा प्रकल्प केवळ जिल्ह्यापुरता मर्यादित नसून संपूर्ण महाराष्ट्राच्या ऊर्जा सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
जळगाव जिल्ह्यातील दीपनगर हे मोठे औष्णिक विद्युत केंद्र आहे. या ठिकाणाहून १२०० मेगावॅटहून अधिक वीज निर्मिती केली जात असते. दरम्यान जळगाव हे राज्यातील सर्वाधिक उष्ण शहर आहे. या 'हॉट' सिटीमध्ये सौरऊर्जेच्या दिशेने अलीकडच्या काळात मोठे पाऊल टाकले आहे. जिल्हा प्रशासनाचा यात महत्त्वाचा वाटा असून, जिल्ह्यातील अनेक जागा सौरऊर्जा प्रकल्पाला उपलब्ध करून दिल्या आहेत.
९०० मेगावॅट नवीन सौरऊर्जा निर्मिती
३९०० एकर जमीन सौर प्रकल्पांसाठी उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यातून ९०० मेगावॅट नवीन सौरऊर्जा निर्मिती केली जाईल. एवढी क्षमता आहे. ३२८ मेगावॅट प्रकल्प सध्या बांधकामाधीन आहे. तर २० मेगावॅट आधीच कार्यान्वित झाला आहे. यातच अलीकडच्या काळात कृषी आणि घरगुती पातळीवर सौर पंप व छप्परावरील सौर पॅनेलद्वारे अतिरिक्त ऊर्जा निर्मिती होत आहे.
सध्याची उत्पादन क्षमता
जिल्ह्यात दीपनगर औष्णिक विद्युत केंद्रातील वीज निर्मितीसह दोन युनिट्स प्रत्येकी ५०० मेगावॅट इतकी वीज निर्मिती केली जात आहे. यातील एक युनिट २१० मेगावॅट वीजनिर्मिती करत आहे. तर लवकरच ६६० मेगावॅटचे चौथे युनिट कार्यान्वित होणार आहे. यामुळे जिल्ह्यात सौरऊर्जा निर्मितीची क्षमता वाढणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.