Jalgoan News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon: विद्युत अपघातात ३० जणांचा मृत्‍यू; वर्षभरात ९५ घटना

विद्युत अपघातात ३० जणांचा मृत्‍यू; वर्षभरात ९५ घटना

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : महावितरणतर्फे वेळोवेळी नागरिकांना विजेपासून सुरक्षित राहण्याचे आवाहन करण्यात येत असले, तरी जिल्ह्यात कुठेना कुठे विजेच्या धक्क्यामुळे मृत्यू झाल्‍याच्‍या घटना घडत आहेत. महावितरणने दिलेल्या आकडेवारीनुसार मागील वर्षभरात जळगाव (Jalgaon) जिल्ह्यात ३० व्यक्तींचा व ४२ प्राण्यांचा मृत्यू (Death) झाला आहे. तसेच काहीजण जखमी झाल्‍याची देखील नोंद आहे. (Jalgaon news 30 death in electric shock in last year)

पावसाळ्यात वीजयंत्रणेच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक वस्तूंपासून सावध राहणे आवश्यक आहे. परंतु, पावसाळा सुरू झाल्याच्‍या अगोदरपासून वारा व पावसात विद्युत तारा तुटत असतात. तसेच पावसामुळे (Rain) ओलावा असताना विद्युत प्रवाह लिकेज होऊन शॅाक लागत असतो. यामुळे मृत्‍यूदेखील ओढावले आहेत. अर्थात यात (MSEDCL) ‘महावितरण’च्या चुकीमुळे काही घटना घडल्या; तर काही घटना या घरातील समस्यांमुळे झाल्या आहेत.

९५ विद्युत अपघातांची नोंद

जळगाव जिल्‍ह्यात २१-२२ या वर्षात ९५ विद्युत अपघात झाल्‍याची नोंद आहे. अनेक घटनांची नोंद झालेली नाही. परंतु, महावितरणकडे असलेल्‍या नोंदीतील ९५ विद्युत अपघातात ४२ प्राणी दगावले आहेत. तर ३० नागरिकांचा मृत्यू झाला असून १६ जखमी आहेत.

महावितरण कर्मचाऱ्यानांही शॉक

महावितरणच्या कर्मचाऱ्यांना सर्व प्रकारचे तांत्रिक प्रशिक्षण देऊन विजेचे काम करून घेण्यात येते. मात्र, अनेकदा अचानक वीजपुरवठा सुरू होणे किंवा इतर तांत्रिक कारणांमुळे महावितरण कर्मचारी विजेच्या धक्क्याने मृत्यूमुखी पडत असल्याच्या घटना घडल्‍या आहेत. परंतु, गेल्या वर्षी जळगाव जिल्ह्यात अप्राणांतिक अपघात होऊन महावितरणचे पाच कर्मचारी जखमी झाले आहेत. तर २ बाह्यस्तोत्र कर्मचारी अप्राणांतिक अपघात होऊन जखमी झाले आहेत.

महावितरणचे आवाहन

पाण्यामुळे ओली झालेली कोणतीही वस्तू वीजवाहक आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी असलेली वीजयंत्रणा किंवा घरगुती उपकरणे तसेच शेतीपंप, स्विच बोर्ड, पत्र्याची घरे, जनावरांचे गोठे आदींपासून वीज अपघात टाळण्यासाठी सदैव सावध व सतर्क राहण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalgaon Crime: जुना वाद नव्यानं पेटला; धारदार शस्त्राने वार करत एकाचा जीव घेतला

Pune Crime : पुण्यात अल्पवयीन मुलांचा हैदोस; टोळक्याने ७ ते ८ गाड्या फोडल्या, VIDEO

Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंडचा चौथा कसोटी सामना ड्रॉ; जडेजा अन् वॉशिंग्टनच्या दमदार खेळीने गड राखला

Pune Rave Party : रेव्ह पार्टीत खडसेंचे जावई! खडसेंचा आवाज दाबण्यासाठी बनाव? रेव्ह पार्टीत नेमकं काय घडलं?

Kalyan News : मोठी बातमी! कल्याणमध्ये भर पावसात ५ ते ६ घरे कोसळली, परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT