Celebrations erupt as BJP and NCP candidates secure early victories in Jalgaon Municipal Corporation elections. saam tv
महाराष्ट्र

Jalgaon Municipal Election Result: भाजपनंतर राष्ट्रवादीनं उघडलं विजयाचं खातं; बंडखोर उमेदवाराचा दारूण पराभव

Jalgaon Municipal Election : जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या निकालांमध्ये भाजपने आपले विजय खाते उघडले आहे, त्यानंतर अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसनेही आपलं खातं उघडलंय. तर भाजपच्या बंडखोर उमेदवाराला दारुण पराभवाचा सामना करावा लागलाय.

Bharat Jadhav

  • जळगाव महापालिका निवडणुकीत भाजपने पहिलं विजयाचं खातं उघडलं

  • प्रभाग क्रमांक 19 मधून राजेंद्र घुगे पाटील विजयी

  • अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीनंही पहिला विजय मिळवला

जळगाव महानगरपालिका निवडणूक निकाल जाहीर होत असून भाजप आणि राष्ट्रवादीनं पहिल्या विजयाचं खातं उघडलंय. जळगावमध्ये प्रभाग क्रमांक 19 मधून भाजपने आपल पहिलं खातं उघडलं आहे. राजेंद्र घुगे पाटील विजयी झालेत. दुसरकडे अजित पवार गटाचे उमेदवार प्रफुल्ल देवकर यांनी पहिल्याच निवडणुकीत बाजी मारलीय.

प्रफुल्ल देवकर हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांचे चिरंजीव आहेत. प्रफुल्ल देवकर यांनी 1096 मतांनी विजय मिळवलाय. तर भाजपचे राजेंद्र घुगे पाटील हे 19 मधून विजयी झालेत. राजेंद्र घुगे पाटील यांनी गेल्या पंचवार्षिकमध्ये स्थायी समिती सभापती म्हणून त्यांनी पदभार सांभाळलाय. आता त्यांची ही दुसरी टर्म आहे, त्यात ते विजयी झालेत.

जळगाव महापालिकेच्या 63 जागांसाठी गुरुवारी मतदान झालं. एकूण 75 जागांपैकी 12 जागा बिनविरोध आल्या आहेत. एकूण 63 जागांसाठी 321 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. महापालिकेत सत्ता स्थापन कोण करणार हे संपूर्ण निकालानंतर समोर येईल, मात्र भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटानं येथे विजयाचे खाते उघडलंय. जळगाव महापालिकेच्या निवडणुकीत महायुतीतील भाजप, शिवसेना, अजित पवार गट हे तिन्ही पक्ष एकत्र होते. त्यांची लढत ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाशी होती.

जळगाव महापालिकेचा निकाल लागण्याआधी साम टीव्हीनं जाहीर केलेल्या एक्झिट पोलमध्ये महायुतीचा विजय होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. येथे भाजप, शिंदे सेना आणि राष्ट्रवादी यांनी महायुती म्हणून निवडणूक लढवली होती. निकालामध्ये भाजप हा मोठा भाऊ ठरेल. तर शिंदेसेना १९ जागांसह धाकटा भाऊ ठरणार असल्याचा दावा एक्झिट पोलमध्ये करण्यात आला होता. दरम्यान येथे राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय. कारण येथे त्यांचे अत्यंत विश्वासू, स्वीय सहाय्यक व आरोग्यदूत म्हणून ओळखले जाणारे अरविंद देशमुख यांना १५ ब मधून उमेदवारी देण्यात आलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबईकरांची घराणेशाहीला चपराक; आमदार, खासदारांच्या मुलांचा दारुण पराभव|VIDEO

BMC Result: मुंबईत भाजपचीच लाट, शिंदेंचीही बाजी; महायुतीच्या आतापर्यंत विजयी झालेल्या उमेदवारांची यादी

Maharashtra Elections Result Live Update: आमदार तानाजी सावंत यांचे पुत्र गिरीराज सावंत पराभूत

Homemade Hair Oil: लांब घनदाट आणि शाईनी केस पाहिजेत? मग आजीने सांगितलेलं हे तेल आठवड्यातून दोन वेळा नक्की लावा

Municipal Election Result: भिंवडी महापालिकेत कोणाचं वर्चस्व? वाचा विजयी उमेदवारांची यादी

SCROLL FOR NEXT