Leopard Attack Saam tv
महाराष्ट्र

Leopard Attack: शेळी चराईला गेलेल्या तरुणावर बिबट्याचा हल्ला; आरडाओरड केल्याने बचाव

Muktainagar News : पिंप्राळा शेतीशिवारात गट क्रमांक १६२ मधील शेतात शेळ्या चराई करण्यासाठी गेला होता. दरम्यान दुपारी बाराच्या सुमारास अचानक बिबट्याने तरुणावर हल्ला केला

Rajesh Sonwane

कुऱ्हा काकोडा (जळगाव) : गावापासून जवळच असलेल्या पिंप्राळा शिवारातील शेतात गेलेल्या एका तरुण शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला (Leopard Attack) करून गंभीर जखमी केले. सदर घटना (Jalgaon) शनिवारी (२ डिसेंबर) दुपारी बाराच्या सुमारास घडली. या तरुणाने वेळीच आरडाओरड केल्याने तो थोडक्यात बचावला. (Tajya Batmya)

पिंप्राळा (ता. मुक्ताईनगर) येथील गणेश गणपत झाल्टे (वय ३४) हा तरुण शेतकरी २ डिसेंबरला पिंप्राळा शेतीशिवारात गट क्रमांक १६२ मधील शेतात शेळ्या चराई करण्यासाठी गेला होता. दरम्यान दुपारी बाराच्या सुमारास अचानक बिबट्याने तरुणावर हल्ला केला. हल्ला करताच तरुणाने जीव वाचविण्यासाठी आरडाओरड केली असता बिबट्याने त्याला सोडले. ओरडण्याच्या आवाजाने आजूबाजूस असलेले (Farmer) शेतकरी धावून आले. तोपर्यंत बिबट्या शेताजवळच असलेल्या वनखंड ५७४ मध्ये असलेल्या वन विभागाच्या बंदीत निघून गेला. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शेतकरी जखमी 

जखमी अवस्थेत तरुणाला शेतकऱ्यांनी कुऱ्हा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. घटनेची माहिती मिळताच प्रभारी वनक्षेत्रपाल दत्तात्रय लोंढे यांच्यासह पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली व जखमीला कुऱ्हा येथे औषधोपचार करून तातडीने मुक्ताईनगर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल नेले. तेथून जळगाव जिल्हा रूग्णालयात नेऊन तेथे उपचार करण्यात आले. यानंतर पुढील उपचार प्राथमिक आरोग्य केंद्रात घेण्यास सांगून डिस्चार्ज दिला. या तरुणावर बिबट्याने उजवा हात आणि खांद्यावर गंभीर दात मारून जखम केली असून, पोटावर पंजाने ओरखडले आहे. दरम्यान, या थरारक हल्ल्यामुळे शेतकरी, शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, या बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : तुमच्याकडे न्याय मिळत नसेल तर गुंडगिरी करू, ठाकरेंचा फडणवीसांना टोला

Rava Puri Recipe : टिफीनमध्ये रोज चपाती कशाला? झटपट करा कुरकुरीत बटाटा पुरीचा नाश्ता

विजयी मेळाव्याला या मराठी कलाकारांची हजेरी, Photo पाहा

Marathi Vijay Melava: संपूर्ण लाईट बंद... इकडून उद्धव, तिकडून राज, ठाकरे बंधूंची ग्रँड एंट्रीने वरळी डोम दणाणला|VIDEO

Raj-Uddhav Thackeray Video: सुवर्णक्षण! खणखणीत भाषनानंतर राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंना टाळी, दोघेही खळखळून हसले, पाहा video

SCROLL FOR NEXT