Muktainagar Crime Saam tv
महाराष्ट्र

Muktainagar Crime : अनैतिक संबंधातून महिलेचा खून; मुक्ताईनगर तालुक्यातील घटना

Muktainagar News : पोलिसांनी महिलेच्या घरी जाऊन माहिती घेतली. त्यानंतर मयत महिलेच्या मुलाच्या फिर्यादीवरून गावातीलच संशयित आरोपी संजय सुधाकर पाटील याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Rajesh Sonwane

जळगाव : अनैतिक संबंधातून महिलेसोबत वाद घालत सदर महिलेच्या डोक्यात दगड टाकून खून केल्याची घटना (Muktainagar) मुक्ताईनगर तालुक्यातील महालखेडा शिवारात घडली आहे. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Tajya Batmya)


महालखेडा (ता. मुक्ताईनगर) येथील मालताबाई मनोज खाडे (वय ३५) असे मयत महिलेचे नाव आहे. मालतीबाई (Jalgaon) या ५ एप्रिलला शेतात कामानिमित्ताने गेलय होत्या. मात्र सायंकाळी महालखेडा शिवारातील डाबर नाल्याजवळ महिलेचा मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी तपस करत महिलेची ओळख पटविली. यानंतर (Police) पोलिसांनी महिलेच्या घरी जाऊन माहिती घेतली. त्यानंतर मयत महिलेच्या (Crime News) मुलाच्या फिर्यादीवरून गावातीलच संशयित आरोपी संजय सुधाकर पाटील याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

संजय पाटील याचे मयत महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याची माहिती समोर आली. तसेच मयत महिलेसोबत तो वाद करत असायचा. या वादातून त्याने डोक्यात दगड टाकुन, शरिरावर गळ्यावर धारदार हत्याराने वार करुन महिलेचा खून केल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मावळात बेकायदेशीर उत्खनन; तहसील कार्यालयावर तृप्ती देसाईंचे बोंबाबोंब आंदोलन

माळशेज घाटात भीषण अपघात; ST बस आणि आयशर टेम्पोची समोरासमोर धडक; वाहतूक विस्कळीत

Weight Loss Tips: किती पावले चालण्याने आठवड्यात १ किलो वजन कमी होईल?

Gyanesh Kumar : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पद्मभूषण द्या; भाजप नेत्याची मागणी

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींसाठी खुशखबर, अवघ्या काही तासांत खात्यात पैसे जमा होणार, महत्त्वाची अपडेट आली समोर

SCROLL FOR NEXT