Muktai palakhi
Muktai palakhi 
महाराष्ट्र

मुक्ताबाई पालखी सोहळा मुक्ताईनगरात माघारी; हरिनामाच्या जयघोषात भाविकांनी केले स्वागत

संजय महाजन

जळगाव : आषाढी एकादशीनिमित्त व भुवैकुंठात पांडुरंगाच्या दर्शनासाठी गेलेली संत मुक्ताबाई पालखी पाच दिवस पंढरपुरात मुक्कामी राहिल्‍यानंतर आज पालखी मुक्ताईनगरात परत आगमन झाले. (jalgaon-marathi-news-muktabai-palkhi-sohala-todate-return-muktainagar)

पंढरपुरात दर वर्षी आषाढी ‌वारीत कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती महावैष्णव संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांकडून भगिनी आदिशक्ती मुक्ताबाईस साडीचोळी भेट देण्याचा ऐतिहासिक भावनिक सोहळा शुक्रवारी (ता. २३) मुक्ताबाई मठात पार पडला. श्री संत मुक्ताबाई पालखी पादुका सोहळा शनिवारी (ता. २४) येथे पार पडून भगवान श्रीविठ्ठल दर्शन व निरोप घेऊन माघारीच्‍या प्रवासाला सुरवात होवून आज (ता. २५) पहाटे चारपर्यंत पालखी सोहळ्याचे मुक्‍ताईनगर येथील नवीन मंदिरात आगमन झाले.

पालखीचे स्‍वागत

आषाढी वारीसाठी मुक्ताईनगर येथून ४० वारकऱ्यांचे मुक्ताबाईच्या पालखी सोहळा पंढरीसाठी गेला होता. गोपाल काला करून आज मुक्ताबाईचा पालखी सोहळा मुक्ताईनगर येथे पोहोचला. यावेळी वारकरी आणि भाविकांनी हरिनामाच्या जयघोषात पालखी सोहळ्याचे स्वागत केले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prakash Ambedkar Pune | प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान!

Today's Marathi News Live: अभिषेक घोसाळकर हत्याप्रकरणी मोठी अपडेट

Ruchira Jadhav: अवतरली सुंदरी... रुचिराचा मनमोहक साडी लूक!

Rahul Gandhi: सत्तेत आल्यास 50 टक्क्यांची मर्यादा हटवणार, आरक्षणावर राहुल गांधींची मोठी घोषणा

Dindori Lok Sabha: आधी थोपटले दंड आता मिळवले हात; दिंडोरी लोकसभेतून जे पी गावितांची माघार

SCROLL FOR NEXT