electric Shock Saam tv
महाराष्ट्र

Jamner News : विजेच्या धक्क्याने झिरो वायरमनचा मृत्यू; विद्युत पोलवर काम करताना घडली घटना

Jalgaon News : गेल्या १० ते १२ वर्षांपासून ते गावात झिरो वायरमन म्हणून कार्यरत होते. दुरुस्तीतून येणाऱ्या उत्पन्नावर त्यांच्या परिवाराचा उदरनिर्वाह सुरू होता.

Rajesh Sonwane

जळगाव : वीजेच्या खांब्यावर काम करीत असताना विजेच्या धक्क्याने झिरो वायरमन खाली कोसळला. यात डोक्याला मार लागल्याने त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची घटना जामनेर तालुक्यातील भागदरी येथे घडली.

जामनेर (Jamner) तालुक्यातील टहाकळी येथील सुनील किसन नरवाडे (वय ४५) असे मृताचे नाव आहे. सुनील नरवाडे हे पत्नी, मुलगा व मुलगीसह वास्तव्यास होते. गेल्या १० ते १२ वर्षांपासून ते गावात झिरो वायरमन म्हणून कार्यरत होते. दुरुस्तीतून येणाऱ्या उत्पन्नावर त्यांच्या परिवाराचा उदरनिर्वाह सुरू होता. दरम्यान ६ जुलैला सायंकाळी पाचच्या सुमारास भागदरी गावात वीज खांब्यावर ते काम करण्यासाठी चढले होते. यात त्यांना विजेचा जोरदार धक्का (electric Shock) लागल्याने ते खांब्यावरून खाली कोसळले. त्यांचा डोक्याला मार लागला.

यानंतर  गावातील नागरिकांनी त्यांना जामनेर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना (Jalgaon) जळगावच्या खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. तेथून २९ जुलैला रात्री साडेआठला त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना, त्यांचा ३० जुलैला मृत्यू झाला. या वेळी कुटुंबीयांनी आक्रोश केला. याबाबत जिल्हापेठ पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Housing Society : बॅचलर्सना सोसायटी घर नाकारू शकते का? कायदा नेमका काय सांगतो?

Ladki Bahin Yojana: गणेशोत्सवात लाडकीच्या खात्यात ₹१५०० येणार की ₹३०००, महत्वाची अपडेट आली समोर

Maharashtra News Live Update: नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने बनावट व्हॉट्सॲप बिझनेस अकाउंट

Gauri Ganpati : गौरी गणपतीच्या सणाला..., गणपतीला जास्वंद तर गौरीला कोणते फुले वाहतात?

India : पाण्यावर तरंगणारा महाल! अद्भुत सौंदर्य पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

SCROLL FOR NEXT