Jalgaon Jamner News Saam tv
महाराष्ट्र

Waghur River Flood : २० वर्षानंतर वाघूर नदीला मोठा पूर; पुलावरून पाणी जात असल्याने वाकोद- तोंडापूरचा संपर्क तुटला

Jalgaon News : उगमस्थान असलेल्या अजिंठा लेणीत पाऊस झाल्याने नदीला मोठा पूर आल्याचे पाहायला मिळत आहे

Rajesh Sonwane

वाकोद (जळगाव) : राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दरम्यान रात्रीपासून जामनेर तालुक्यातील वाकोदसह परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने नद्या, नाले तुडुंबं भरून वाहू लागले आहेत. यामुळे वाघुर नदीला गेल्या २० वर्षात पहिल्यांदा मोठा पूर आला असून नदीवरील पूल पाण्याखाली आल्याने वाकोद- तोंडापूरचा संपर्क तुटला आहे.  

अजिंठा लेणी (Jalgaon) परिसरात देखील मोठ्या प्रमाणात पाऊस होत आहे. दरम्यान वाघूर नदीचे उगमस्थान असलेल्या अजिंठा लेणीत पाऊस झाल्याने नदीला मोठा पूर आल्याचे पाहायला मिळत आहे. वाघूर नदीला खूप वर्षानंतर इतक्या मोठ्या प्रमाणात पूर (Flood) आल्याने नागरिक पूर पाहण्यासाठी एकच गर्दी करत आहे. तर नदी काठच्या शेतात पाणी भरले अडून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. केळी, कपाशी, मका पाण्याखाली आल्याने शेतकरी हवालदील झाले आहे. 

वाघूर नदीचा पूल धोकादायक स्थितीत
नुकताच डागडुजी करण्यात आलेला वाकोद- फर्दापूर रस्त्यावरील पूल देखील धोकादायक स्थितीत असून या पुरामुळे या पुलाला देखील पुलाच्या खालील भागात तडे गेलेले असून या पुलावरून वाहन जातांना तेथे कंप होत आहे. नवीन पूल बांधकाममधील अडथळा दूर झाल्यानंतर देखील त्याचे काम अत्यंत धिम्या गतीने सुरु असून प्रशासन अजून किती दिवस जुन्या पुलावरून वाहतूक करण्यास भाग पाडत आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांच्या सुख-समृद्धीसाठी मावळात महाचंडी आणि महापर्जन्य याग; 6000 भाविकांचा सहभाग

IAS Transfer: 4 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, राज्याच्या प्रशासनात मोठा फेरबदल

‘मोदी का बाप भी जाएगा’,भरसभेत खरगेंच्या विधानाने राजकारण तापलं! मोदींचं समर्थन करणाऱ्या तरुणालाही मारहाण

देशाच्या नंदनवनात साकारतोय भव्य रेल्वे प्रकल्प! 12 स्थानकं, 28 बोगदे अन् 57 पुलांचं जाळं; 83 टक्के प्रवास बोगद्यातून

2-3 महिन्यांत राजकारणात मोठी उलथापालथ; राज्यातील नेत्यांचे राजकीय भूकंपाचे संकेत

SCROLL FOR NEXT