Jamner Accident News Saam tv
महाराष्ट्र

Jamner Accident News : जीप- कंटेनरची समोरासमोर धडक; भीषण अपघातात तीन ठार

Jalgaon News : अपघात झाल्यानंतर ग्रामस्थांनी तातडीने धाव घेत दोघा मृतांसह गंभीर जखमीला उपजिल्हा रुग्णालयात आणले

Rajesh Sonwane

जामनेर (जळगाव) : जामनेरपासून जवळच असलेल्या नागदेवता मंदिराजवळ जीप व कंटेनरची (Jalgaon) समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात (Accident) जीपमधील तीन जण ठार झाले. मृत तिघेही संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर येथील असल्याचे समजते. अद्याप मृतांच्या नावांची शहनिशा झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. (Maharashtra News)

जामनेर कडून पहूरकडे भरधाव निघालेल्या कंटेनरने समोरून येत असलेल्या जीपला धडक दिली. या भीषण अपघातात शेख समीर शेख नजीर (वय २०), अल्लाउद्दीन गयासोद्दीन शेख (वय ४०, दोघे रा. बालानगर, ता. पैठण, जि. संभाजीनगर) आणि बोलेरो जीपचा चालक साजन जगन बडोले (वय २५, रा. खंडवा, मध्य प्रदेश) यांचा मृत्यू झाला. तिघेही जामनेर कडून मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर- खंडव्याकडे जात होते. या अपघातानंतर कंटेनर चालक फरार झाला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नागरिकांची मदतीसाठी धाव 

अपघात झाल्यानंतर ग्रामस्थांनी तातडीने धाव घेत दोघा मृतांसह गंभीर जखमीला उपजिल्हा रुग्णालयात आणले. अपघाताची माहिती मिळताच रुग्णवाहिका चालक जालम राजपूत, गणेश चौधरी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. तर पोलिस उपनिरीक्षक जी. एम. अहिरे हे देखील पथकासह घटनास्थळी पोहोचले. रुग्णवाहिकेसह जालमसिंग राजपूत यांनी ग्रामस्थांच्या मदतीने वाहनातील दोघांचे मृतदेह व गंभीर जखमी असलेल्या एकाला तातडीने उपजिल्हा रुग्णालयात आणले. रुग्णालयात पोहोचेपर्यंत तिसऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाला होता, असे सांगण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Afghanistan vs India, 1st T20I: भारतीयांसाठी आनंदाची बातमी; अभिषेक शर्मा तडाखेबाज खेळीनं अफगाण संघाचा फडशा

Afghanistan vs India, 1st T20I: पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात राष्ट्रगीतापूर्वी 'वंदे मातरम'

Beed Crime: भय इथलं संपत नाही...; उपसरपंचाकडून तरुणाला अमानुष मारहाण VIDEO व्हायरल

भाजपला मोठा धक्का; माजी आमदाराचा काँग्रेसमध्ये प्रवेश, आणखी काही पुढारीही पक्ष सोडण्याच्या वाटेवर

धक्कादायक! बिल भरण्यावरून वाद; बार मॅनेजरला चौघांनी बेदम मारहाण|VIDEO

SCROLL FOR NEXT