Jalgaon Crime Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon Crime: जन्मदात्या बापालाच संपविले; शेतीच्या वादातून मुलाचे कृत्य, संशयिताच्या मुलानेच दिली फिर्याद

Jalgaon News : वडिलांसोबत वाटणीवरून वाद घालण्यास सुरवात केली. वडिलांनी नकार दिला असता त्यांच्यात शाब्दिक वाद झाला

साम टिव्ही ब्युरो

शेदुर्णी (जळगाव) : तरंगवाडी शिवारात शेती वाटणीच्या वादातून मुलाने वडिलांच्या डोक्यात पावडे घालून (Crime News) खून केल्याल्याची धक्कादायक घटना  ९ डिसेंबरला घडली. या घटनेनंतर संशयिताच्या मुलाने वडिलांविरोधात फिर्याद दिली. यानंतर आरोपी मुलास (Police) पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. (Breaking Marathi News)

शेंदुर्णी (ता. जामनेर) येथील शेतकरी नाना बडगुजर (वय ८२) हे ९ डिसेंबरला सकाळी शेतात कपाशी वेचणीचे काम करत होते. साधारण (Jalgaon) नऊच्या सुमारास त्यांचा मुलगा कैलास नाना बडगुजर (वय ५६) हा शेतात आला. त्याने वडिलांसोबत वाटणीवरून वाद घालण्यास सुरवात केली. वडिलांनी नकार दिला असता त्यांच्यात शाब्दिक वाद झाला. यानंतर संशयित कैलासने वडिल नाना बडगुजर यांच्या डोक्यात भुसा भरण्याच्या पावड्याने जोरात वार केला. यामुळे नाना बडगुजर हे जागेवरच कोसळले. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान संशयित कैलासचा मुलगा विशाल आणि त्याची पत्नी शेतात काम करीत होते. विशाल याने डोक्यात वार केल्याचे बघताच धाव घेत वडिलांच्या हातून पावडे हिसकावून जखमी बाबांना सावरण्याचा प्रयत्न केला. ते कोणतीही हालचाल करीत नसल्याचे बघून संशयिताने शेतांमधून पळ काढला. या घटनेबाबत शेतकऱ्यांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत पोलिसांना खबर दिली. शेंदुर्णी दूरक्षेत्रचे पोलिस निरीक्षक दिलीप पाटील, शशिकांत पाटील, पोलिस कर्मचारी प्रशांत विरनारे, शशिकांत पाटील यांनी घटनास्थळी पोहचले. संशयिताचा मुलगा विशाल कैलास बडगुजर (वय ३३) याने दिलेल्या फिर्यादीवरून पहूर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक सचिन सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक दिलीप पाटील तपास करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kurkuri Bhendi Recipe : लहान मुलांसाठी ५ मिनिटांत बनवा कुरकुरी भेंडी, नोट करा रेसिपी

Maharashtra News Live Update: शासकीय कर्मचारी संघटनेचा संपाचा तिसरा दिवस

ठाणे रेल्वे स्टेशनजवळ 'शिवशाही'ला भीषण आग; बस जळून खाक, VIDEO

Ishan Kishan: सनरायझर्स हैदराबादला विजयाची हॅट्रिक मिळवून देऊनही इशानचं कर्णधारपद जाणार? काय आहे कारण?

Kidney health: सकाळी उठल्यावर ही ५ लक्षणं दिसली तर समजा किडनी निकामी होतेय; कधी घ्याल डॉक्टरांचा सल्ला

SCROLL FOR NEXT