Jamner Crime Saam tv
महाराष्ट्र

Jamner Crime : घरगुती वाद टोकाला; पतीकडून भयंकर कृत्य, पत्नीचा मृत्यू

Jalgaon News : पती- पत्नीमध्ये कोणत्या तरी कारणातून वाद निर्माण झाला. दोघांमधील हा वाद विकोपाला गेल्यानंतर संतापलेल्या पतीने पत्नीवर शस्त्राने हल्ला करत जीवे ठार मारले. या घटनेने गावात खळबळ उडाली आहे

Rajesh Sonwane

जामनेर (जळगाव) : पती- पत्नीमध्ये झालेल्या घरगुती वादातून भयंकर घटना घडली असून संतापलेल्या पतीने पत्नीवर धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. सदर जामनेर तालुक्यातील मुंदखेडा गावात घडली. या घटनेने गावात खळबळ उडाली असून घटनेनंतर अवघ्या काही तासातच मारेकरी पतीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

जळगावच्या जामनेर तालुक्यातील मुंदखेडा या गावात १८ सप्टेंबरला दुपारी चार वाजेच्या सुमारास सदरची घटना घडली आहे. या घटनेत अनिता ऊर्फ मीनाबाई भिल असे मृत महिलेचे नाव आहे. तर बाळू भिल असे मारेकरी आरोपी पतीचे नाव आहे. दरम्यान गुरुवारी बाळू आणि अनिता यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला. बराच वेळ चाललेल्या या वादात संतापाच्या भरात बाळू याने पत्नी अनिता हिच्यावर चाकूने सपासप वार केले. 

मारेकरी पती झाला फरार 

यामुळे जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. यानंतर बाळू हा घटनास्थळावरून फरार झाला होता. तर आजूबाजूच्या नागरिकांना घटना लक्षात आल्यानंतर त्यांनी अनिता ऊर्फ मीनाबाईला जखमी अवस्थेत जामनेर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. या घटनेने गावात खळबळ उडाली आहे. 

मारेकरी पती पोलिसांच्या ताब्यात 

सदर घटनेची माहिती समजताच पोलिस निरीक्षक मुरलीधर कासार हे पोलीस पथकासह तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा पंचनामा केल्यानंतर तपासाला सुरवात केली. तर घटनास्थळावरून फरार झालेल्या बाळू यास पोलिसांनी अवघ्या काही तासांतच त्याला पकडून बेड्या ठोकल्या. या प्रकरणी मारेकरी पतीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Smit Machhar : मुंबईचा कॅप्टन स्मित मच्छार ठरला देवदूत! जीव धोक्यात घालून १७४ प्रवाशांचे प्राण वाचवले; नेमकं काय घडलं?

Rajpal Yadav Viral Video: 'तुम्हाला बाहेर जावं लागेल...'; मुश्ताक खान यांच्या शोकसभेतून राजपाल यादवला खरंच बाहेर काढलं?

Maharashtra News Live Update: प्रदीप पुर्णेकर हत्या प्रकरण; ठाणे क्राईम ब्राँचकडून ३ महिला ताब्यात

Phone overheating: फोन वारंवार गरम होत असेल तर काय करावं?

Congress: काँग्रेस भवनाबाहेर आढळला महिला नेत्याच्या नवऱ्याचा मृतदेह, डोक्यात गोळी घुसल्याने मृत्यू

SCROLL FOR NEXT