Accident News Saam tv
महाराष्ट्र

Accident News : देवदर्शनाला जाताना तरुणावर काळाचा घाला; मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक

Jalgaon News : जामनेर तालुक्यातील कुंभारी तांडा येथील अमोल शिवाजी गोसावी व आशिक गब्बर गोसावी हे वाकोद येथील साखरादेवी यात्रेनिमित्ताने देवीच्या दर्शनाला जात होते

Rajesh Sonwane

जामनेर (जळगाव) : नवरात्रोत्सवानिमित्ताने साखरादेवी यात्रेत देवीच्या दर्शनाला जाताना तरुणावर काळाने घाला घातला. जामनेर तालुक्यातील वाकोदजवळ दुचाकी आणि पिकअप वाहनांची समोरासमोर धडक झाल्याने हा भीषण अपघात झाला. यात एकाचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. 

जामनेर (Jamner) तालुक्यातील कुंभारी तांडा येथील अमोल शिवाजी गोसावी व आशिक गब्बर गोसावी हे वाकोद येथील साखरादेवी यात्रेनिमित्ताने देवीच्या दर्शनाला जात होते. देवीचे दर्शन घेऊन वाकोदच्या आठवडे बाजार असल्याने दसऱ्याचा बाजार करून येतो असं सांगून निघाले. गावापासून काही अंतरावर गेले असतांनाच वाकोदकडून तोंडापूरकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या पिकअप वाहनाने मोटारसायकलला समोरून जोरदार (Accident) धडक दिली. यात अमोलचा जागीच मृत्यू झाला.

वाहनांची धडक जोरदार असल्याने अमोल घटनास्थळी रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. तर त्याच्या सोबत असलेला एकजण गंभीर जखमी झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पहुर पोलीस वेळीच दाखल होऊन सदर जखमीला पुढील उपचारासाठी रवाना केले. तर अपघातगस्त दुचाकी पहुर पोलीस स्टेशनला जमा करण्यात आली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Karjat Tourism : हिरव्यागार जंगलात लपलेला सुंदर धबधबा, पावसाळ्यात वीकेंड येथेच प्लान करा

Maharashtra Live News Update: आषाढी एकादशीनिमित्त श्रीक्षेत्र आळंदीमध्ये भक्तिरसाचा अपार उत्सव

Breakfast Recipe: वाटीभर रव्यापासून बनवा 'हा' हेल्दी नाश्ता, टिफिनसाठी सुद्धा ठरेल बेस्ट

Cancer Prevention: 'हे' विशेष प्रथिने कर्करोग वाढण्यापूर्वीच थांबवतात, जाणून घ्या कार्य कसे करते

Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशीला उपवासाचे नियम आणि पूजा विधी जाणून घ्या

SCROLL FOR NEXT