Accident News Saam tv
महाराष्ट्र

Accident News : समोरासमोर धडक होऊन दुचाकींचा भीषण अपघात; दोघांचा मृत्यू

Jalgaon Jamner News : घरी परत येत असताना काही अंतरावर गाव असताना दुचाकीला समोरून येणाऱ्या दुचाकीची जोरदार धडक बसली. यात दोघे फेकले जाऊन दोघांचा मृत्यू झाला असून एकजण जखमी झाला आहे

Rajesh Sonwane

जळगाव : शेंदुर्णी येथील दोघे मित्र सोयगाव येथे दुर्गा विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी गेले होते. मिरवणूक पाहून शेंदुर्णीकडे येणाऱ्या आणि शेंदुर्णीहून सोयगावकडे जाणाऱ्या दोन दुचाकींचा समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एकजण जखमी आहे. 

जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथील नचिकेत मनोज जोशी (वय १८) आणि विशाल अशोक सूर्यवंशी (वय २५) या दोन युवकांचा अपघातात मृत्यू झाला आहे. दरम्यान संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव येथे दुर्गादेवी विसर्जनाची मिरवणूक मोठी असल्याने याठिकाणी मिरवणूक पाहण्यासाठी दोघे मित्र दुचाकीने सोयगावला गेले होते. मिरवणूक पाहून झाल्यानंतर घरी येण्यासाठी परतीच्या निघाले होते. 

दोघांचा जागीच मृत्यू 

शेंदुर्णी जवळ असताना नचिकेत जोशी याची दुचाकी आणि समोरून आलेल्या दुचाकीची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. यात नचिकेतसह त्याच्या सोबत असलेल्या विशाल सूर्यवंशी याचा देखील जागीच मृत्यू झाला. दरम्यान विशाल सूर्यवंशी याच्या वडिलांचे गेल्यावर्षीच निधन झाले होते. आता विशालचाही अपघाती मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
पारोळा तालुक्यातील दळवेलजवळील महामार्गावर कारने दुचाकीला मागून धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. गोरख सुरसिंग भिल (वय ४७, रा. भोलाणे ता.पारोळा) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. गोरख भिल हे शुक्रवारी दुचाकीने पारोळा येथे श्री बालाजी महाराज यांची रथ मिरवणूक पाहण्यासाठी आले होते. तेथून ते घराकडे परतताना रात्री आठला भरधाव कार चालक ओम मनस्कर (रा.वाडी माळुगे ता. नांदुरा जि. बुलढाणा) याने दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. धडकेत गोरख भिल जखमी झाले असता त्यांना पारोळा कुटीर रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी कारचालक मनस्कर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan Yojana : खुशखबर! दसरा-दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात ₹२,००० येणार, महत्त्वाची अपडेट समोर

Mumbai Accident: मुंबईत एकाच रात्री दोन भयानक अपघात; रस्ता ओलांडताना तरुणीचा मृत्यू, डंपरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा करूण अंत

दारूची बाटली, भरलेले पेग अन्...; शवविच्छेदन विभागात रंगली दारू पार्टी; पुण्यातील YCM रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

Maharashtra News Live Update: विजय संकल्प मेळाव्यातून किरण सरनाईक यांच्या विजयाचा निर्धार

CJP Protest: 'सेंट्रल पार्कमध्ये तिरंगा फडकवता येणार पण...' दिल्ली पोलिसांची CJP समोर ठेवली मोठी अट

SCROLL FOR NEXT