Jalgaon Fire News Saam TV
महाराष्ट्र

Jalgaon Fire News : जळगावमध्ये अग्नितांडव! केमिकल कंपनीला भीषण आग, 4 जण अडकल्याची भीती

Fire News : आग लागल्यानंतर केमिकलचा कंपनीत मोठा स्फोट झाला. कंपनीत काम करणारे चार कर्मचारी कंपनीमध्ये अडकल्याची प्राथमिक माहिती समोर आलीये.

Ruchika Jadhav

संजय महाजन

जळगाव एमआयडीसी परिसरातील केमिकल कंपनीला भीषण आग लागली आहे. या आगीत चार जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. सदर घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडालीये.

मोरया केमिकल कंपनीला सकाळी नऊच्या सुमारास ही आग लागलीये. आग लागल्यानंतर कंपनीत केमिकलचा मोठा स्फोट झाला. घटना घडली तेव्हा कही कामगार येथे काम करत होते. या घटनेमुळे काही कर्मचारी जखमी झाले आहेत. तर कंपनीत काम करणारे चार कर्मचारी कंपनीमध्ये अडकल्याची भीती आहे.

घटनेची माहिती मिळताच जळगाव अग्निशमन दलाचे पथक घटनस्थळी दाखल झालेय. तीस ते चाळीस अग्नीशमन दलाची वाहाने घटनास्थळी दाखल झाली आहेत. मात्र अद्याप आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं नाही.

केमिकलचा स्फोट होत असल्याने आग आणखी वाढतच चालली आहे. आगीचे लोट हवेत दूरवर पसरलेत. आग अटोक्यात येत नसल्याने आसपासच्या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Care Remedies: आठवड्याभरात उगवतील नवे केस, रोज वापरा हे चमत्कारी तेल

Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला बायकोसाठी घ्या सोन्याचे मंगळसूत्र, 5 लेटेस्ट डिझाईन्स

Maharashtra News Live Update: कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रात तापमानाचा पारा ३९ अंशांवर

Latur : लातूरमध्ये गतीमंद विद्यार्थ्याला फळी तुटेपर्यंत मारलं; शिक्षकाच्या क्रूरतेचा Video व्हायरल

Nashik Shocking : TCS धर्मांतर प्रकरणानंतर आणखी एक भयानक कांड; तरुणीच्या गळ्यातील तुळशीमाळ काढली अन् दारू पाजून केला बलात्कार

SCROLL FOR NEXT