Erandol Accident Saam tv
महाराष्ट्र

Erandol Accident: दुचाकींची समोरासमोर धडक; दोन जणांचा मृत्यू, महिला गंभीर

Jalgaon News : अंतुर्लीजवळील आयटीआयजवळ दोघा दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली. दोघेही यात मृत्युमुखी पडले.

साम टिव्ही ब्युरो

एरंडोल (जळगाव) : एरंडोल तालुक्यातील कासोदा येथून जवळ असलेल्या अंतुर्ली खुर्द शिवारात भरधाव (Erandol) दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. या अपघातात (Accident) दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला. तर महिला जखमी झाली आहे. महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Maharashtra News)

सदर अपघात १९ डिसेंबरला रात्रीच्या सुमारास घडला. यात कासोदा येथून अमोल मांगीलाल भोई (रा. उत्राण) हा दुचाकीने उत्राणकडे जात होता. त्याच वेळी निपाणेकडून वासुदेव गोरख पाटील हा त्याच्या दुचाकीवर कासोद्याकडे निघाला होता. दरम्यान, (Jalgaon) अंतुर्लीजवळील आयटीआयजवळ दोघा दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली. दोघेही यात मृत्युमुखी पडले. रात्रीची वेळ असल्याने लवकर मदत मिळू शकली नाही. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दुचाकीवरील महिला जखमी 

या अपघातात एका दुचाकीवर मागे बसलेली अंतुर्ली येथील महिला जखमी झाली आहे. या महिलेले जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. याबाबत कासोदा पोलिस ठाण्यात घटनेबाबत नोंद करण्यात करण्यात आली. सहाय्यक पोलिस निरीक्षक योगिता नारखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार रवींद्र पाटील हे तपास करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sugar Free Modak: डायबिटीजची चिंता न करता खा मोदक; साखरेशिवाय बनवा झटपट आणि हेल्दी 'शुगर फ्री मोदक'

Maharashtra News Live Update: पुण्यातील मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीमच्या भव्य मिरवणूकीला सुरुवात

Diabetes and Panchamrit: डायबिटीज असलेल्या व्यक्तींनी पंचामृत प्यावे की नाही? जाणून घ्या

Pune : प्रायव्हेट पार्टला हळद कुंकू लावलं,पतीचा मंगळदोष काढण्यासाठी अघोरी पूजा, पुण्यात भयंकर प्रकार

Latest Mangalsutra Designs: नऊवारी साडीवर उठून दिसतील अस्सल पारंपारिक मंगळसूत्र, 5 लेटेस्ट डिझाईन्स

SCROLL FOR NEXT