धरणगाव (जळगाव) : गावात महाप्रसाद घेऊन गावातील मित्र पोहण्यासाठी गेले होते. सर्वानी विहिरीत उडी मारली. सर्वच बाहेर निघाले. मात्र त्यांच्यातील एक तरुणाला बाहेर निघत ना आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाल्याची घटना धरणगाव तालुक्यातील भवरखेडे गावात घडली.
भवरखेडे (ता. धरणगाव) येथील निवृत्ती श्यामकांत पाटील (वय २०) असे मृत तरुणाचे नाव आहे. गावात कीर्तन सप्ताह आयोजित (Dharangaon News) करण्यात आलेल्या होता. कीर्तन सप्ताहाची समाप्ती असल्याने यानिमित्ताने महाप्रसादाचा कार्यक्रम होता. निवृत्तीने सप्ताह कार्यक्रमात जेवण केले. यानंतर तो गावातील पंधरा ते वीस मित्रांसोबत शेतातील विहिरीत पोहायला गेला. निवृत्तीला पोहता येत नव्हते, तरी देखील मित्र विहिरीत पोहत असल्याचे पाहून त्याने पाण्यात उडी मारली. परंतु विहीर पन्नास फूट खोल असल्याने त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यू (Death) झाला.
विहिरीतील पाणी उपसून मृतदेह काढला बाहेर
सोबतच्या मित्रांनी घटनेबाबत गावात माहिती दिली. यानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी जात शोध घेण्यास सुरवात केली. विहिरीत पन्नास फुटांपर्यंत पाणी असल्याने निवृत्तीचा पाण्यात शोध घेणे कठीण जात होते. यानंतर चार वीजपंपांच्या सहाय्याने विहिरीचे सर्व पाणी बाहेर काढून सहा तासांनंतर मृतदेह बाहेर काढण्यात आला. धरणगाव पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली. निवृत्तीच्या कुटुंबास आर्थिक मदतीची मागणी करण्यात येत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.