Jalgaon Cyber Crime Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon Cyber Crime: ऑनलाईन ट्रेडींगच्या नावे साडे नऊलाखांचा गंडा

ऑनलाईन ट्रेडींगच्या नावे साडे नऊलाखांचा गंडा

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : ऑनलाईन ट्रेडींगमध्ये गुंतवणूक करून नफा मिळवून देण्याच्या नावाखाली फसवणूक (Cyber Crime) करणाऱ्या संशयिताला गुजरात राज्यातील भावनगर येथून (Jalgaon) जळगाव सायबर पोलिसांनी अटक केली. (Maharashtra News)

रावेर तालुक्यातील एकाला ऑनलाईन ट्रेडींगमध्ये गुंतवणुकीतून मोठा नफा मिळवून देण्याच्या नावाखाली तब्बल ९ लाख ३० हजारांची ऑनलाईन फसवणूक केली होती. याबाबत जळगाव सायबर पोलिस (Cyber Police) ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी फिर्यादीचे व्हॅट्‌सॲप आणि बँकेतील व्यवहारच्या मदतीने संशयित भावनगर येथील असल्याचे निष्पन्न केले. सायबर ठाण्याचे पोलिस निरीक्षक अशोक उतेकर यांनी उपनिरीक्षक दिगंबर थोरात, पोलिस नाईक प्रवीण वाघ, दिलीप चिंचोले, गौरव पाटील यांना भावनगरला रवाना केले.

ताब्‍यात घेत पाच लाख हस्‍तगत

पथकाने संशयित विजय ऊर्फ अजय दयाभाई कलसरीया (वय ३३, रा. अम्रेली, भावनगर) याला ताब्यात घेतले. चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून पाच लाख रुपये हस्तगत केले आहेत. पोलिस निरीक्षक अशोक उतेकर तपास करीत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election Result: बारामतीचा दादा 'अजितदादा'! लोकसभेला काका, विधानसभेला पुतण्या

Mahrashtra Election Result : हूश्श! अखेर रोहित पवार विजयी झाले

Maharashtra Election Results: अजित पवारांचे शिलेदार चमकले! पाहा दादांच्या राष्ट्रवादीच्या ४१ विजयी आमदारांची संपूर्ण यादी

PM Narendra Modi : 'एक है, तो सेफ है'; महाराष्ट्रातील विधानसभा निकालानंतर PM नरेंद्र मोदींनी पुन्हा दिला नारा

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: महायुतीच्या विजयाचं दिल्लीत सेलिब्रेशन

SCROLL FOR NEXT