Cyber Crime Saam tv
महाराष्ट्र

Cyber Crime : शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे आमिष; ११ लाखात फसवणूक

Jalgaon News : कोटक निओ नावाचे ॲप्लिकेशन डाउनलोड करून त्यात पैसे गुंतविण्यास सांगितले. त्यानुसार संजय वसतकार यांनी पैशांची गुंतवणूक केली.

Rajesh Sonwane

जळगाव : सायबर गुन्हेगारांकडून वेगवेगळ्या प्रकारे फसवणूक केली जाते. प्रामुख्याने गुंतवणुकीचे आमिष देत फसवणूक करण्याचे प्रकार मागील काही दिवसात वाढले आहे. अशाच प्रकारे जळगावतील एकाची शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणूक करण्याच्या नावाने तब्बल ११ लाखात फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

जळगाव (Jalgaon) शहरातील एसएमआयटी कॉलेज परिसरातील संजय राजाराम वसतकार (वय ४२) यांच्याशी २८ जुलैला नारायण जिंदाल व चिन्मई रेड्डी यांनी संपर्क साधला. त्यांचा विश्वास संपादन करून वेगवेगळ्या ग्रुपमध्ये ॲड करून लिंक पाठविली. नंतर कोटक निओ नावाचे ॲप्लिकेशन डाउनलोड करून त्यात पैसे (Cyber Crime) गुंतविण्यास सांगितले. त्यानुसार संजय वसतकार यांनी पैशांची गुंतवणूक केली. त्यांनी गुंतविलेल्या पैशांवर वसतकार यांना दोन लाख ८२ हजार ५९९ रुपयांचा नफा झाल्याचे समोरच्याने सांगितले. 

दरम्यान, संशयितांनी संजय वसतकार यांच्याकडून वेळोवेळी ११ लाख ३० हजार ४७ रुपये ऑनलाइन बँकिंगद्वारे वेगवेगळ्या बँक खात्यात स्वीकारले. काही दिवसांनंतर गुंतवणुकीवर झालेल्या नफ्याची रक्कम काढता येत नसल्याचे संजय वसतकार यांच्या लक्षात आले. यानंतर त्यांनी सायबर पोलिसांत (Cyber Police) तक्रार दिली. त्यावरून नारायण जिंदल व चिन्मई रेड्डी या दोघांविरुद्ध सायबर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस निरीक्षक नीलेश गायकवाड तपास करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Perfect Bra Tips: महिलांसाठी ब्रा घालण्याचे नियम काय आहेत?

Baramati: १३ वर्षीय मुलीवर बलात्कार प्रकरणी अटक, आरोपीची पोलिस कोठडीत आत्महत्या, बारामतीत खळबळ

Maharashtra News Live Update: उष्माघातापासून वाहनचालकांना दिलासा, उद्यापासून बदलापुरातील सर्व सिग्नल दुपारी बंद राहणार

Heatstroke Treatment: खिशात कांदा ठेवून उन्हात फिरलात तर उष्माघाताचा त्रास होत नाही? वैज्ञानिकदृष्ट्या नेमकं काय खरं?

Short Kurta Design: २५० ते ३०० रुपयांत खरेदी करा हे ट्रेंडी शॉर्ट कुर्ते; ऑफिस किंवा आऊटिंगसाठी मिळेल परफेक्ट लूक

SCROLL FOR NEXT