Cyber Crime News
Cyber Crime News Saam tv
महाराष्ट्र

Cyber Crime: इन्स्टाग्रामवर बनावट खाते करून तरुणीची बदनामी

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : इन्स्टाग्रामवर बनावट खाते तयार करून प्राध्यापक तरुणीच्या ओळखीच्या व्यक्तींना अश्लील छायाचित्र पाठवून बदनामी (Crime) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत शनिवारी (ता. २५) जळगाव सायबर पोलिसात (Cyber Police) अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. (Jalgaon Cyber Crime News)

जळगाव (Jalgaon) सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बोदवड शहरातील २४ वर्षीय प्राध्यापिका तरुणी कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. १० ते २४ सप्टेंबरदरम्यान अज्ञात व्यक्तीने या तरुणीच्या नावाने इन्स्टाग्रामवर (Instagram) बनावट खाते तयार केले. यानंतर तिच्या ओळखीच्या लोकांना व मित्रांना रिक्वेस्ट पाठवून तिची बदनामी व्हावी; यासाठी (Cyber Crime) बनावट खात्याच्या स्टेटसवर महिला व पुरुषांचे अश्लील छायाचित्र ठेवून बदनामी केल्याचा प्रकार समोर आला.

अज्ञाताविरूद्ध गुन्‍हा दाखल

सदर प्रकार लक्षात आल्यानंतर तरुणीने शनिवारी जळगाव सायबर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून सायंकाळी पाचला अज्ञात व्यक्तीविरोधात जळगाव सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक दिलीप भागवत तपास करीत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Blood Pressure: उच्च रक्तदाब असणाऱ्यांनी चहा प्यावा की नाही?

Today's Marathi News Live : पुण्यात मतदानादरम्यान 57 ईव्हीएम मशीन बदलले

Traffic On Yamunotri Gangotri Expressway: यमुनोत्री, गंगोत्री महामार्गावर वाहतूक कोंडी; महाराष्ट्रातील भाविक १०-१३ तासांपासून अडकले

Reliance Jio: ३३६ दिवस चालणारा स्वस्त रिचार्ज प्लान; डेटा, कॉलिंगसह मिळेल OTT लाभ

Mumbai News: मोठी बातमी! खासदार नवनीत राणांच्या घरी चोरी, नोकरानेच केला हात साफ; गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT