Jalgaon Cyber Crime Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon Cyber Crime : ईडीच्या कार्यालयातून बोलत असल्याची बतावणी; डॉक्टराची १९ लाखांत फसवणूक

Jalgaon News : सायबर गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. समोरच्या व्यक्तीला भीती दाखवत फसवणूक केल्याचे प्रकार मागील काही दिवसात वाढले

Rajesh Sonwane

जळगाव : सायबर गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. समोरच्या व्यक्तीला भीती दाखवत फसवणूक केल्याचे प्रकार मागील काही दिवसात वाढले असून असाच प्रकार जळगावात समोर आला आहे. या प्रकारात एका डॉक्टरांची फसवणूक झाली आहे. तब्बल १९ लाख रुपयात फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. 

जळगाव (Jalgaon) शहरातील एका डॉक्टरला १ मे रोजी अंकुश वर्मा आणि सुनीलकुमार नामक व्यक्तींचे फोन आले. त्यांनी डॉक्टरांशी संवाद साधताना आम्ही ईडीच्या ऑफिसमधून बोलतोय. मनी लॉड्रींगमध्ये तुमचे बँक खाते आले आहे. त्यात तुमचा सहभाग आहे, (Cyber Crime) असे दिसतेय. असे सांगत डॉक्टरांच्या मनात भीती निर्माण केली. दरम्यान संशयितांनी त्यांचे बँक खात्याचा क्रमांक पाठवून त्यात पैसे टाकण्यास डॉक्टरला सांगितले. 

घाबरलेल्या (Docter) डॉक्टराने समोरच्यानं सांगितल्याप्रमाणे १ ते १८ मेपर्यंत या कालावधीत १९ लाख २० हजार रुपये ऑनलाईन ट्रान्सफर केले. मात्र, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर डॉक्टरांनी ऑनलाईन तक्रार नोंदविली. त्यानंतर २१ मे रोजी (Cyber Police) सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. सायबर पोलिस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय निकम तपास करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात शिवजयंती निमित्त वाहतूक बदल, पर्यायी मार्ग वापरण्याचे पोलिसांचे आवाहन

Kalyan Local : धक्कादायक! लोकलमध्ये महिलांचा बेक्कार वाद, एकीने दुसरीचा दंडाचा चावा घेतला अन्...

Health Care : निरोगी आयुष्यासाठी दिवसातून किती चपाती खाव्यात? जाणून घ्या

Ahilyanagar Tourism : नगरमध्ये निसर्गाच्या कुशीत लपलाय भव्य किल्ला; इतिहास वाचून अभिमान वाटेल, एकदा जाऊनच या

Rinku Rajguru : "मी आरपार प्रेम करते..."; ब्रेकअपवर रिंकू खूप काही बोलली, 'त्या' नात्याबद्दल नेमकं काय म्हणाली?

SCROLL FOR NEXT