Jalgaon Crime News  Saam Tv
महाराष्ट्र

Jalgaon Crime: जळगावमध्ये चाललंय काय? प्रेमविवाह केल्यामुळे आधी तरुणाची हत्या, आता आरोपींची घरे जाळण्याचा प्रयत्न

Jalgaon Man Killed for Love Marriage: जळगावच्या पिंप्राळा हुडको येथे प्रेमविवाह केला या रागातून तरुणाच्या कुटुंबावर जीवघेणा हल्ला करून तरुणाची हत्या करण्यात आली. या हल्ल्यामध्ये तरुणाचा

Priya More

संजय महाजन, जळगाव

जळगावमध्ये प्रेमविवाह केल्यामुळे संतप्त झालेल्या मुलीच्या कुटुंबीयांनी तरुणासह त्याच्या कुटुंबीयांवर जीवघेणा हल्ला केला होता. या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू तर ५ जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर आज तरुणाच्या कुटुबीयांनी आरोपीचे घर जाळण्याचा प्रयत्न केला. पोलिसांमुळे मोठा अनर्थ टळला. याप्रकरणी १० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगावच्या पिंप्राळा हुडको येथे प्रेमविवाह केला या रागातून तरुणाच्या कुटुंबावर हल्ला करून तरुणाचा खून केल्याची घटना घडली. या घटनेमध्ये मयत तरुणाच्या कुटुंबीयांच्या नातेवाईकांच्या वतीने आज आरोपींचे घर जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. या ठिकाणी बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांमुळे पुढील अनर्थ टळला आहे.

याप्रकरणी १० जणांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सात जणांना पोलिसांनी अटक केल्याची माहिती पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिली आहे. दरम्यान, मुकेश शिरसाठ या तरुणाने प्रेमविवाह केल्यामुळे संतप्त झालेल्या मुलीच्या कुटुंबीयांनी भरदिवसा मुकेशसह त्याच्या कुटुंबीयांवर हल्ला केला होता. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

शिरसाठ कुटुंबावर ७ ते ८ जणांनी चॉपर, कोयता, चाकू आणि लाकडी काठ्यांच्या सहाय्याने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या २६ वर्षीय मुकेश शिरसाठचा मृत्यू झाला होता. तर ५ जण गंभीर जखमी झाले. जखमींवर जळगावच्या जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर तरुण आणि तरुणीच्या घराबाहेर पोलिसांनी कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT