Jalgaon Crime News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon Crime News : जळगावात तरुणाची हत्या; अनैतिक संबंधातून खून झाल्याच्या अंदाज

Jalgaon News : लक्ष्मी जिनिंग मागील शेतात सुरेश सोलंकी याचा मृतदेह २० एप्रिलला शेतात काम करणाऱ्या कामगारांना दिसून आला. याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली.

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : आव्हाणे रस्त्यावरील एका जिनिंगच्या मागे असलेल्या शेतात २६ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आला. दरम्यान (jalgaon) अनैतिक संबंधातून तरुणाची हत्या झाल्याच्या संशय पोलिसांनी व्यक्त केला असून याप्रकरणी एका महिलेसह तरुणाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. (Maharashtra News)

सुरेश परमसिंग सोलंकी (वय २६) असे तरुणाचे नाव आहे. गेहिज खेमला (जि. सेंधावा, मध्यप्रदेश) येथील मूळ रहिवाशी असलेला सुरेश सोलंकी हा लक्ष्मी जिनींग येथील कामगार खोली येथे वास्तव्यास होता. दरम्यान लक्ष्मी जिनिंग मागील शेतात सुरेश सोलंकी याचा मृतदेह २० एप्रिलला शेतात (Crime News) काम करणाऱ्या कामगारांना दिसून आला. याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. यानंतर अपर पोलिस (Police) अधीक्षक अशोक नखाते, उपअधीक्षक संदीप गावित, पोलिस निरीक्षक, किशन नजन पाटील त्यांनी घटनास्थळी येत मृताची ओळख पटविली. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मृत सुरेश हा लक्ष्मी जिनिंगमध्ये ठेकेदार मनोज सोनवणे यांच्याकडे कमला होता. १९ एप्रिलला दुपारी तो मनोज सोनवणे याला भेटून गेला होता. शनिवारी तो कामावर न आल्याने त्याचा शोध घेतला असता त्याचा मृतदेह (Jalgaon Police) आढळून आला. श्वान पथकाने दाखवलेला मार्ग, सीसीटिव्ही आणि इतर पुराव्यांच्या आधारे तपास सुरू आहे. दरम्यान हा खून अनैतिक संबंधातून झाल्याचा संशय असून एका महिलेला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नवी मुंबई विमानतळाला मोदींचं नाव देण्याच्या भाजपमध्ये हालचाली; राऊतांच्या दाव्यानं खळबळ | VIDEO

Maharashtra Live News Update: पन्हाळगड परिसरात बिबट्याचा अपघाती मृत्यू

'गृहराज्यमंत्र्यांकडून गँगस्टरला शस्त्रपरवाना, मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा', शिवसेना आमदाराचा गंभीर आरोप

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना सप्टेंबर-ऑक्टोबरचे ₹३००० एकत्र येणार नाहीत? कारण काय?

Sunny Deol Film: सनी देओल त्याच्यापेक्षा ३३ वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत करणार रोमान्स; नव्या चित्रपटातील खास सीन लीक

SCROLL FOR NEXT