Crime News Saam tv
महाराष्ट्र

Crime News : एकाच रात्री तीन ठिकाणी चोरी; दागिन्यांसह रोकड लंपास, दूध विक्रीची दुकानेही फोडली

Jalgaon News : जळगाव शहरात रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरु होता. अशात देखील चोरटयांनी संधी साधली आहे. प्रमुख शासकीय अधिकारी यांच्या निवासस्थान परिसरातील भागांत एकाच रात्री तीन ठिकाणी चोरी झाली

Rajesh Sonwane

जळगाव : रात्रीच्या सुमारास जळगाव शहरातील उच्चभ्रू वस्ती असलेल्या परिसरात चोरट्यानी हात साफ केल्याची घटना घडली आहे. एकाच रात्रीत तीन ठिकाणी चोरी केल्याची घटना घडली असून यात दागिन्यांसह रोख रक्कम घेऊन चोरटे फरार झाले आहेत. तसेच याच परिसरात असलेल्या दूध विक्रीची दोन दुकाने देखील फोडल्याची घटना घडली आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. 

जळगाव शहरात रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरु होता. अशात देखील चोरटयांनी संधी साधली आहे. प्रमुख शासकीय अधिकारी यांच्या निवासस्थान परिसरातील भागांत एकाच रात्री तीन ठिकाणी चोरी झाली आहे. त्यात एक घरफोडीसह दूध विक्रेत्यांची दोन दुकाने चोरट्यांनी फोडली आहेत. घरातील दागिने व दुकांतील काही रोकड चोरट्यांनी चोरून नेल्याची बाब सकाळी उघडकीस आली

घरातून सोने व रोकड लांबविली 

दरम्यान याच भागात असलेल्या डी- मार्ट समोरील रामनगर परिसरात रचना वाडकर यांच्या नातेवाईकांचे घर काही दिवसांपासून बंद आहे. या बंद असलेल्या घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. घरातून दोन तोळे सोने व दहा हजार रुपयांची रोकड असा ऐवज चोरून नेल्याचे सकाळी उघडकीस आले. तसेच दूध विक्रीच्या दुकानांमधून देखील रोकड लांबविली आहे. 

दुचाकी चोरणाऱ्या चोरट्याला अटक
सांगली
: सांगलीच्या कुरळप पोलिसांनी एका दुचाकी चोरट्याला अटक केली आहे. त्याच्याकडून दोन लाख ४० हजार रुपये किमतीच्या पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. रोहित आकळे (रा. नेर्ले, जिल्हा सांगली) असे या दुचाकी चोरट्याचं नाव आहे. पुणे- बंगळूरू महामार्गावरील तांदूळवाडी फाटा येथे विनानंबर प्लेट गाडी घेऊन फिरत असताना संशयित रोहितला कुरळप पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली. यात सदरची दुचाकी चोरीची असल्याचा समोर आले. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुख्यमंत्री विजय यांना पहिल्याच दिवशी मोठा धक्का; पाठिंबा देणारा मित्रपक्ष झाला नाराज, नेमकं काय घडलं?

Accident News : लग्नाला निघालेल्या दाम्पत्याचा भीषण अपघात, भरधाव पिकअपची कारला जोरदार धडक

Maharashtra News Live Update: वाढत्या तापमानाचा परिणाम चिमुकल्यांवर होत असल्याने पालकांची चिंता वाढली

Protein Foods: प्रोटीनसाठी चिकन अन् प्रोटीन पावडर कशाला? हे 5 व्हेज पदार्थ आहेत सगळ्यात बेस्ट

Sanju Rathod Success Story: ट्रेनमध्ये बसून एकट्याने गाणी ऐकली, पण आज बनला प्रसिद्ध गायक ; 'गुलाबी साडी' फेम संजू राठोडला आठवला संघर्षाचा तो काळ

SCROLL FOR NEXT