Kalyan Crime News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon Crime News: तिसरीतल्या विद्यार्थ्यांसोबत शिक्षकचं अनैसर्गिक कृत्य, जळगावातील धक्कादायक घटना

तिसरीतल्या विद्यार्थ्यांसोबत शिक्षकचं अनैसर्गिक कृत्य, जळगावातील धक्कादायक घटना

संजय जाधव

Jalgaon Crime News: जळगावात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे जामोद तालुक्यातील धानोरा महासिद्ध येथील जिल्हा परिषद शाळेच्या नराधम शिक्षकाने आपल्याच शाळेतील तिसरीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यांसोबत अनैसर्गिक कृत्य केलं आहे. त्याने विद्यार्थ्याला शिकवणीच्या नावाखाली बोलवून अनैसर्गिक कृत्य केलं आहे. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

या घटनेमुळे जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली असून याप्रकरणी पीडित विद्यार्थ्यांच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी या शिक्षकाविरुद्ध कलम 377, 506 व पोकसो नुसार गुन्हा नोंद करून शिक्षकाला अटक केली आहे.

ही घटना धानोरा गावात माहित पडताच आरोपी शिक्षकाला नागरिकांनी चोपही दिला. या प्रकरणी जळगाव जामोद पोलीस पुढील तपास करत आहे. (Latest Marathi News)

सायकलवर फिरवण्याच्या बहाण्याने 7 वर्षीय मुलासोबत अनैसर्गिक कृत्य

दरम्यान, याआधी नांदेडमध्ये मागील वर्षी दोन जणांनी अंगणात खेळत असलेल्या एका सात वर्षाच्या मुलाला 'तुला सायकल वर फिरवतो' म्हणून शेतात नेऊन अनैसर्गिक कृत्य केल्याची धक्कादायक घटना घडली होती. भोकर तालुक्यातील एका गावातील ही घटना घडली होती.

अनैसर्गिक अत्याचार करणारे दोघेही 16 वर्षाचे अल्पवयीन होते. यानंतर मुलाने आपल्या सोबत घडलेला प्रसंग आपल्या आईला सांगितला. आईने तातडीने पोलिस ठाणे गाठून मुलाचे लैंगिक शोषण प्रकरणात भोकर पोलीस ठाण्यात तक्रार देऊन गुन्हा दाखल केला होता. यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : एकाची मराठीसाठी तळमळ, दुसऱ्याची खुर्चीसाठी मळमळ; एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंसाठी सॉफ्ट कॉर्नर

Eknath Shinde: दाढीवरून अर्धाच हात फिरवला, पूर्ण फिरवला असता तर...; ठाकरेंच्या पुष्पा स्टाइल टीकेवर एकनाथ शिंदेंचा पलटवार

Chocolate Brownie Recipe: स्नॅक्स टाइमसाठी झटपट बनवा माउथ वाटरिंग चॉकलेट ब्राउनी, नोट करा ही सोपी रेसिपी

Vijay Melava: राज-उद्धव ठाकरे एकत्र येताच संजय राऊतांचं मविआबाबत मोठं विधान

Sushil Kedia News : सुशील केडियाच्या ऑफिसची तोडफोड केल्यानंतर पहिलीच मोठी कारवाई; मनसे कार्यकर्त्यांना घेतलं ताब्यात, गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT