Fraud Case Saam tv
महाराष्ट्र

Fraud Case : रेल्वे नोकरीचे आमीष; ९ लाख रुपयात फसवणूक; ठाण्यातील दाम्पत्य ताब्यात

Jalgaon News : ऑनलाईन पद्धतीने व्यवहार झाला होता. दरम्यान रक्कम देऊन बऱ्याच दिवसांचा कालावधी उलटल्यानंतर देखील नोकरी नाही. यामुळे दारकुंडे यांनी विचारणा केली. परंतु समोरच्यांकडून उडवाउडवीची उत्तरे दिली

Rajesh Sonwane

जळगाव : नोकरीचे आमिष देत किंवा गुंतवणुकीचे आमिष देत फसवणूक केली जात असल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. त्यानुसार रेल्वेमध्ये नोकरी लावण्याचे आमिष देत एका तरुणाची फसणूक करण्यात आल्याचा प्रकार जळगाव शहरात समोर आला आहे. या प्रकरणी ठाणे येथील एका दाम्पत्याला अटक करण्यात आली आहे. तर यात आणखी काही जणांचा सहभाग असल्याची माहिती समोर येत आहे. 

जळगाव शहरातील शिवाजीनगर परिसरात वास्तव्यास असलेले तथा महापालिकेतील माजी नगरसेवक नवनाथ विश्वनाथ दारकुंडे (वय ५५) यांची ९ लाख रुपयात फसवणूक झाली. दारकुंडे यांच्या मुलाला रेल्वेत नोकरी लावून देतो, असे सांगून किरण आनंदा सानप, संगीता किरण सानप, समीक्षा किरण सानप (तिघे रा. ठाणे) यांच्यसह शैलेश विनोदराय शुक्ला (रा. मुंबई) व दिवाकर राय (रा. दिल्ली) यानी वेळोवेळी नवनाथ दारकुंडे यांच्याकडून ऑनलाइन पद्धतीने नऊ लाख १८ हजार ५०० रुपये स्वीकारले. 

नोकरी नाही, रक्कमही मिळेना 

ऑनलाईन पद्धतीने हा व्यवहार झाला होता. दरम्यान रक्कम देऊन बऱ्याच दिवसांचा कालावधी उलटल्यानंतर देखील मुलाला नोकरी लावून दिली नाही. यामुळे दारकुंडे यांनी सातत्याने विचारणा केली. परंतु समोरच्यांकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात होती. नोकरी लागत नसल्याने दारकुंडे यांनी दिलेल्या पैशांची मागणी केली. मात्र पैसेही परत देत नाहीत, नोकरीही मिळत नाही म्हणून आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. 

ठाण्यातून दाम्पत्य ताब्यात 

फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर दारकुंडे यांनी जळगाव शहर पोलिस ठाण्यात जात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. निरीक्षक अनिल भवारी यांच्या पथकातील उपनिरीक्षक महेश घायतड यांच्यासह पथकाने ठाणे जिल्ह्यातून किरण सानप, संगीता किरण सानप या दाम्पत्यास अटक केली आहे. तर फसवणुकीत सहभागी असलेल्या आणखी तिघांचा शोध पोलीस घेत आहेत. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu Shastra : स्वयंपाक घरात देवघर असावे की नसावे? वास्तुशास्त्राचे नियम पाळल्यास घरात नांदेल सुख-समृद्धी

Maharashtra News Live Update: रायगडमध्ये घरोघरी गणरायाच आगमन

Gold Rate Today: गणराया पावला! सोन्याच्या दरात मोठी घसरण, आज खरेदीची सुवर्णसंधी; वाचा 18k- 22k आणि 24k चे दर

Badishep : जेवणानंतर बडीशेप खाताय? ५ गंभीर दुष्परिणाम वाचून आजपासूनच खाणे बंद कराल

Bigg Boss 20: 'माझ्या संस्कारांवर बोलू नको नाहीतर...'; 'बिग बॉस 20'च्या घरात पहिल्याच आठवड्यात वादाची ठिणगी; VIDEO चर्चेत

SCROLL FOR NEXT