Crime News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon News: धक्‍कादायक..झोपेतच वृद्धेचे कान कापून दागिने लांबविले; रेल येथील रात्रीची घटना

धक्‍कादायक..झोपेतच वृद्धेचे कान कापून दागिने लांबविले; रेल येथील रात्रीची घटना

साम टिव्ही ब्युरो

धरणगाव (जळगाव) : रेल (ता. धरणगाव) येथे एका ७० वर्षीय वृद्ध महिलेला मारहाण करून कान कापत (Crime) कानातील ८ ते १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे किल्लू आणि रोकड चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी धरणगाव पोलिसात (Police) अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Letest Marathi News)

रेल येथील विमलबाई श्रीराम पाटील (वय ७०) ह्या घराच्या वरील पत्री शेडमध्ये रात्री एकट्या झोपलेल्या होत्या. त्यावेळी अज्ञात चोरट्याने त्यांच्या कानातील ८ ते १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे किल्लु कान कापून तसेच डोक्यावर व तोंडावर दुखापत करुन चोरुन नेले. सकाळी ९ वाजले तरी आजी खाली उतरली नाही; म्हणून शेजारची महिला वर बघायला गेली. तेव्हा आजी रक्तबंबाळ अवस्थेत पडून होत्या.

५० हजाराची रोकड

घटनेची माहिती मिळताच पिंप्री येथे वास्‍तव्‍यास असलेले त्‍यांचे नातू निलेश पाटील हे घटनास्थळी पोहचले. त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, आजीजवळ साधारण ५० हजाराची रोकड असल्याचे देखील निलेश पाटील यांनी सांगितले. पोलिसांना माहिती दिल्‍यानंतर अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे. चोपडा विभागीय अधिकारी कृषीकेश रावले, अमळनेर विभागीय अधिकारी राकेश जाधव यांची टीम घटनास्थळी दाखल झाली. तर पुढील तपास सपोनि गणेश बुवा करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Junnar ST Bus Accident: गुंजाळवाडीजवळ शेगाव-कल्याण एसटीचा भीषण अपघात; दोन ते तीनवेळा उलटली बस, दोघांचा मृत्यू, १७ जखमी

चित्रपटसृष्टी हादरली! प्रसिद्ध दिग्दर्शकाची आत्महत्या; नदीमध्ये सापडला मृतदेह

Mumbai Accident: मुंबईत अपघाताचा थरार! सिमेंट मिक्सरने दोघांना चिरडलं, वडिलांच्या डोळ्यासमोर ८ वर्षीय अहानाने सोडले प्राण

Dagdusheth Halwai Ganpati: पुण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट’ला 'अ' वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा

Diesel Crisis: परभणीत डिझेलची टंचाई, पेट्रोल पंपाबाहेर कॅन घेऊन रांगा; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT