Jalgaon Crime News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon Crime News : नोकराने लावला आठ लाखांचा चुना; रोज जमा होणाऱ्या रक्कमेत गैरव्यवहार

Jalgaon News : लॉजिंग काऊंटरच्या व्यवस्थापकाकडे जमा करण्यात येते २८ डिसेंबरला व्यवस्थापक योगेश महाशब्दे यांनी हॉटेलमधील कर्मचारी आदित्य वाघ याने हॉटेलमधून आणलेली एक लाख ३५ हजारांची रोकड जमा करून घेतली

Rajesh Sonwane

जळगाव : जळगावच्या रेल्वेस्थानक परिसरात असलेल्या हॉटेल आणि लॉजिंगमध्ये कामाला असलेल्या नोकराने अपहार केल्याचे उघडकीस आले आहे. नऊ महिन्यांत नोकराने तब्बल आठ लाखांच्या रकमेवर डल्ला मारला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर हॉटेल मालकाने पोलिसात तक्रार दिली. यानंतर पोलिसांनी संशयित आदित्य सुनील वाघ याला  ताब्यात घेतले आहे. 

जळगाव रेल्वेस्थानक परिसरात असलेल्या सिल्व्हर पॅलेस या हॉटेलमध्ये रोज जमा होणारी रक्कम सिल्व्हर पॅलेसच्या लॉजिंग काऊंटरच्या व्यवस्थापकाकडे जमा करण्यात येते. दरम्यान २८ डिसेंबरला व्यवस्थापक योगेश महाशब्दे यांनी हॉटेलमधील कर्मचारी आदित्य वाघ याने हॉटेलमधून आणलेली एक लाख ३५ हजारांची रोकड जमा करून घेतली. रक्कम जमा करून आदित्य वाघ गेला. मात्र, हॉटेलमधील अन्य एका कर्मचाऱ्याने यांनी महाशब्देंना फोन करून किती रक्कम जमा केली, याची खात्री करून घेतली. पाठविलेल्या रकमेत तब्बल ४५ हजारांचा झोल असल्याचे आढळून आले.

चुकून रक्कम राहिल्याचा केला बनाव 
दरम्यान रक्कम कमी असल्याने हॉटेलचे व्यवस्थापक महाशब्दे यांनी आदित्य यास विचारणा केली, मात्र ४५ हजारांच्या रोकडचे बंडल चुकून बॅगेत राहिल्याचे आदित्यने सांगितले. थोड्या वेळाने आदित्यने सदरची रक्कम योगेश महाशब्दे यांच्याकडे आणून दिली. मात्र या प्रकारामुळे व्यवस्थापकाला संशय आल्याने घडलेल्या प्रकाराबाबत हॉटेल मालकांस माहिती दिली.


पोलिसांनी ताब्यात घेताच प्रकृती बिघडली 
यानंतर मालकांने एप्रिलपासून तिन्ही हॉटेल्सच्या सर्व व्यवहारांची तपासणी केली. त्यानुसार दर महिन्याला जमा होणाऱ्या रकमेत तफावत आढळून आल्याचे दिसून आले. यामध्ये साधारण ८ लाख रुपयांचा अपहार झाल्याचे समोर आले. यानंतर पोलिसांत तक्रार देण्यात आली असून यानंतर आदित्य वाघ याला पोलिसांनी अटक केली. दरम्यान पोलिसांनी ताब्यात घेत पोलिस ठाण्यात आणले असता चौकशी सुरु होण्यापूर्वीच प्रकृती खालवल्याने तत्काळ त्याला पोलिसांनी जिल्‍हा रुग्णालयात रवाना केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Apple Benefits For Constipation: रोज सकाळी रिकाम्या पोटी खा एक सफरचंद; बद्धकोष्ठता आणि अपचनाचा त्रास होईल दूर

Good News: मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात ₹५००० जमा होणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Saree To Ghagra : आईच्या साडीपासून बनवा गुजराती स्टाइल घागरा; नवरात्रीत तुमचा लूक दिसेल एकदम खास, वाचा ड्रेपिंगची सोपी पद्धत

WhatsApp New Feature: WhatsApp युजर्ससाठी खूशखबर! आले भन्नाट फीचर, आता 'या' ट्रिक्सने स्केड्यूल करा मेसेजेस, कसं वापरायचं?

Abhijeet Dipke : "पाकिस्तान चीन करू नका महाराष्ट्राच्या दुष्काळाकडे लक्ष द्या" अभिजित दीपिकेंचा एकनाथ शिंदे यांना टोला

SCROLL FOR NEXT