Fraud Case Saam tv
महाराष्ट्र

Fraud Case : पाचोऱ्यातील दांपत्याचा अजब कारनामा; उपमुख्यमंत्र्याचा पीए असल्याचे सांगत १८ जणांची फसवणूक

Jalgaon News : माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयातील स्वीय सहायक असल्याचे भासवले. त्यासाठी त्याने बनावट ओळखपत्र, लेटर पॅड आणि बनावट अपॉइंटमेंट लेटरही दाखवले

Rajesh Sonwane

जळगाव : वेगवेगळे आमिष दाखवत फसवणूक करण्यात येत असल्याचे अनेक प्रकार आतापर्यंत समोर आले आहेत. तर जळगाव जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यात एका दाम्पत्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयात स्वीय सहायक असल्याचे सांगत १८ जणांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी जळगावच्या शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 

ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार सर्रास घडत आले आहेत. याशिवाय वेगवेगळे आमिष दाखवून फसवणूक केली जात आहे. नोकरीचे आमिष दाखविल्याने अगदी सहज कोणीही बळी पडत आहेत. यात उपमुख्यमंत्री यांचा स्वीय्य सहाय्यक असल्याचे सांगितल्यानंतर कोणीही विश्वास ठेवून त्याला बळी पडत आहेत. त्यानुसार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा स्वीय्य सहाय्यक असल्याचे सांगून रेल्वेमध्ये नोकरी, म्हाडामध्ये फ्लॅट यासह विवीध प्रकारची आमिष दाखवत लोकांना फसविण्यात आले आहे. 

दहा महिन्यांच्या कालावधीत एकामागून एकाची फसवणूक होत असल्याचे आढळून आले आहे. या प्रकरणात पाचोरा येथील रहिवासी हितेश रमेश संघवी (वय ४९) आणि त्याची पत्नी अर्पिता संघवी (वय ४५, दोघे रा. नवी मुंबई) यांनी माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयातील स्वीय सहायक असल्याचे सांगत तरुण- तरुणींना नोकरीसह विवीध प्रकारची आमिषे आणि अडलेली कामे काढून देण्याचे आश्वासने देत गंडा घातला आहे. या दाम्पत्याने १८ जणांची मिळून साधारण ५५ लाख ६० हजार रुपयांची फसवणूक केली आहे.  

पोलिसात गुन्हा दाखल 

संघवी दाम्पत्याने १८ जणांकडून सुमारे ५५ लाख ६० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. अनेक दिवस होऊनही नोकरी किंवा कुठलेही काम मिळाले नाही, म्हणून फसवणूक झाल्याची शंका आल्याने हर्षल बारी यांच्यासह इतरांनी याप्रकरणात थेट पोलिस अधिक्षकांची भेट घेत फसवणूक झाल्याचे सांगितले. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत तत्काळ शनिपेठ पोलिसांत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याच्या तपासाकरीता आर्थिक गुन्हेशाखेकडे गुन्हा वर्ग करण्यात आला असून संशयितांच्या शोधार्थ पथक मुंबईला रवाना झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cancer symptoms: ही ५ लक्षणं दिसली तर समजा कॅन्सर तुमच्या शरीरात करतोय घर

Maharashtra News Live Update: 6 वर्षीय चिमुकल्यासह आठ जणांना चावा, घटना सीसीटीव्ही मध्ये कैद

कॉकरोच जनता पार्टीने वाढवलं शिवसेनेचं टेन्शन? पक्षातल्या खासदारांनी मनातलं सांगितलं, बैठकीत काय चर्चा झाली?

पुलासाठी ७ कोटी खर्च केला, ३ वर्षांत तडे गेले; प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण

नवी मुंबईत 'हिट अँड रन', बेलापूरजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत ३८ वर्षीय स्कूटर चालकाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT