crime  saam tv
महाराष्ट्र

Jalgaon News : आधी वडिलांची आत्महत्या, २ दिवसांनी मुलाचाही संशयास्पद मृत्यू, नेमकं घडलं काय?

Crime News : वडिलांनी चिठ्ठी लिहून आत्महत्या केली. त्यानंतर मुलगा बेपत्ता झाला. दोन दिवसांनी मुलाचा संशयास्पद मृतदेह आढळला. वडिलांच्या पाठोपाठ मुलाचा मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

Yash Shirke

संजय महाजन, साम टीव्ही, प्रतिनिधी

Jalgaon : वडिलांच्या आत्महत्येनंतर दोन दिवसांनी तरुणाचा मृतदेह आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना जळगावच्या धरणगाव तालुक्यात घडल्याची माहिती समोर आली आहे. मृत तरुणाच्या वडिलांनी दोन दिवसांपूर्वी चिठ्ठी लिहून आत्महत्या केली होती. या पिता-पुत्राच्या मृत्यूने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मृत तरुणाचे नाव विकी उर्फ हितेश विठ्ठल पाटील असे आहे. तो इन्स्टाग्रामवर रिल बनवत असे. रिल स्टार असलेल्या या तरुणाचा संशयास्पद मृतदेह आढळला. विकी हा एरंडोल शहरात राहत होता. दोन दिवसांपासून तो बेपत्ता होता. आज पोलिसांना त्याचा मृतदेह सापडला.

विकी पाटीलचे वडील विठ्ठल पाटील हे माजी सैनिक आहेत. विकी आणि त्याचे आईवडील एरंडोल शहरात वेगवेगळे राहत होते. २५ फेब्रुवारी रोजी विकीच्या वडिलांनी म्हणजेच विठ्ठल पाटील यांनी गळफास घेवून आत्महत्या केली होती. सुसाईड नोट लिहून त्यांनी स्वतःचे जीवन संपविले होते. त्यानंतर त्यांचा मुलगा बेपत्ता झाला.

वडिलांनी आत्महत्या केल्यानंतर मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना जळगावमध्ये घडली आहे. सैनिक वडील आणि रील स्टार मुलगा यांच्या मृत्यूमुळे धरणगाव तालुका हादरला आहे. या दोन्ही घटनांचा एकमेकांशी संबंध आहे का याचा शोध पोलीस घेत आहेत. वडिलांप्रमाणे मुलानेही आत्महत्या केली की त्याची हत्या झाली या प्रश्नाचे उत्तर पोलीस शोधत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PBKS vs MI: तिलक वर्माची तुफानी खेळी, ६ विकेट राखत मुंबईचा विजय; पंजाबचा सलग पाचवा पराभव

Pollution: हवेतील प्रदूषण होणार कमी; 'शेवाळ' गिळणार कार्बन डायऑक्साईड

दोन दिवस वर्क फ्रॉम होम; मंत्र्यांचे परदेश दौरे रद्द, नवीन वाहन खरेदीवर बंदी; सरकारचे मोठे निर्णय

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात, पण ७० लाख महिलांचा हप्ता झाला बंद, कारण आलं समोर

लसीकरणानंतर चिमुकलीचा मृत्यू; आजोबा रात्रभर मृतदेह घेऊन बसले, आरोग्य यंत्रणेचा संतापजनक प्रकार

SCROLL FOR NEXT