Jalgaon Crime Saam tv
महाराष्ट्र

शेताचा वाद; काकाकडून मारहाण, तरुणाचा मृत्‍यू

शेताचा वाद; काकाकडून मारहाण, तरुणाचा मृत्‍यू

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : शेतीच्या वादातून तिन्‍ही भावंडात वादाचे रूपांतर मारहाणीत झाले. या दरम्‍यान झालेल्या प्राणघातक हल्ल्यात तरुणाचा उपचारादरम्यान गुरुवारी (ता. १२) मृत्यू झाला. जिल्हा शासकीय रुग्णालयात (Hospital) नातेवाइकांनी एकच गर्दी केली होती. (jalgaon crime news Farm disputes Uncle's beating death of a young man)

एरंडोलच्या (Erandol) मारोती मढी येथे आबा भगवान महाजन पत्नी व दोन मुलांसह वास्तव्यास असून त्यांना, सुरेश, तुकाराम आणि मगन असे तीन भाऊ आहेत. त्यांच्या आईच्या हिस्स्याचे शेत जो मुलगा करेल; त्याने त्यांना वर्षांला १५ हजार रुपये द्यायचे, असे कौटुंबिक बैठकीत ठरविले होते. याच शेताच्या वादातून आबा महाजन यांचे सुरेश, तुकाराम आणि मगन या तिघा भावांशी गुरुवारी (ता. १२) वाद उफाळून आला. वादाचे रूपांतर हाणामारीत (Crime News) होऊन आबा महाजन यांना भाऊबंदकीत मारहाण होत असल्याचे ऐकून त्यांचा मोठा मुलगा उमेश तिथे आला. याचा राग आल्याने सुरेश, तुकाराम, मगन व तुकारामचा मुलगा मनोज आणि पत्नी उषाबाई यांनी आबा महाजन आणि उमेश महाजन यांना लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण केली. उमेशच्या गुप्तांगावर वार झाल्याने तो गंभीर जखमी झाला. तातडीने त्याला एरंडोल ग्रामीण रुग्णालयात नेले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जखमीला जळगावला हलविण्याचा सल्ला दिला. दुपारी एकला बेशुद्धावस्थेत उमेशला घेऊन कुटुंब जिल्हा सामान्य रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (Jalgaon Medicale Collage) दाखल झाले. जिल्‍हा रुग्णालयात उपचार सुरू असताना, सायंकाळी त्याचा मृत्यू झाला. उमेशचा मृत्यू झाल्याचे कळताच कुटुंबियांनी एकच आक्रोश केला.

अगोदर अटक करा, नंतर शवविच्‍छेदन

उमेश महाजन याचा मृत्यू झाल्याने नातेवाइकांनी जिल्हा रुग्णालयात गर्दी केली. विच्छेदनासाठी मृतदेह रवाना केल्यानंतर मृताचा भाऊ नीलेश याने शवविच्छेदनाला नकार देत अगोदर संशयितांना अटक करा, अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पावित्रा घेतल्याने रात्री उशिरापर्यंत मृतदेहाचे शवविच्छेदन होऊ शकले नाही. रात्री दहापर्यंत एरंडोल पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याचे निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. उमेशच्या मागे आई सुनीता, वडील आबा महाजन, भाऊ नीलेश, पत्नी मयुरी, बहीण रूपाली असा परिवार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wildcat: मांजर कोणत्या बाजूने आडवी गेली तर काय करावं?

Kitchen Hacks: पीठ मळून फ्रिजमध्ये रात्रभर ठेवल्याने शरीराला त्रास होतो का? जाणून घ्या सत्य

महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या रोखणार, सरकारचं मोठं पाऊल, टास्क फोर्स नेमकं काय करणार?

Maharashtra Live News Update : राज्यात आज शिवजंयतीचा उत्साह

T20 World Cup मध्ये टीम इंडियाची विजयी घोडदौड,सलग चौथा विजय; नेदरलँड्सचा १७ धावांनी पराभव

SCROLL FOR NEXT